Vivo V80 Price and Specifications : नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताना आपण सर्वप्रथम आपले बजेट ठरवतो. त्यानंतर त्या बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या विविध कंपन्यांच्या फोनची आणि त्यांच्या फीचर्सची तुलना करतो. तुम्हीही ७० ते ८० हजार रुपयांपर्यंतचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा. विवोने आपल्या V सीरीजमधील नवीन Vivo V80 स्मार्टफोन लाँच केला आहे. या सीरीजमधील फोन त्यांच्या कॅमेरा फीचर्ससाठी ओळखले जातात. Vivo V80 हा Vivo V70 या आधीच्या मॉडेलची पुढील आवृत्ती आहे. चला तर मग, या नवीन स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये आणि त्यातील फीचर्स जाणून घेऊया.

किंमत

भारतात Vivo V80 च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ६२ हजार ९९९ रुपये आहे. हे डिव्हाइस 8GB रॅम + 256GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 512GB स्टोरेज अशा पर्यायांमध्येही उपलब्ध आहे, ज्यांच्या किमती अनुक्रमे ६९ हजार ९९९ रुपये आणि ७९ हजार ९९९ रुपये आहे.

रंग पर्याय

Vivo V80 स्टेलर ब्लॅक (Stellar Black), होरायझन ब्लू (Horizon Blue) आणि सनराईज अँथम (Sunrise Anthem) या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन १३ ऑक्टोबर २०२६ पासून फ्लिपकार्ट (Flipkart) आणि देशभरातील Vivo ऑनलाइन स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

वैशिष्ट्ये

Vivo V80 मध्ये ६.५९ इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो १४४Hz रिफ्रेश रेट, P3 वाइड कलर गॅमट सपोर्ट आणि ४५९ppi पिक्सेल डेन्सिटीसह येतो. फोटोग्राफीसाठी, यात Zeiss च्या सहकार्याने तयार केलेला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात ऑटोफोकस, ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि f/1.88 अपर्चर असलेला ५०MP चा मुख्य कॅमेरा, ऑटोफोकस, OIS आणि f/2.65 अपर्चर असलेला ५०MP चा Zeiss नाईट टेलिफोटो कॅमेरा, तसेच f/2.2 अपर्चर आणि ११५-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू असलेला ८MP चा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा यांचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी, यात ऑटोफोकस, f/2.0 अपर्चर आणि ९२-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू असलेला ५०MP चा Zeiss ग्रुप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo V80 मध्ये Snapdragon 7 Gen 4 चिपसेटचा वापर करण्यात आला असून, हा फोन Android 17 वर आधारित OriginOS 7 वर चालतो. या हँडसेटमध्ये 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 7,200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

google trends

इतर फीचर्स

कनेक्टिव्हिटीसाठी यात Wi-Fi, Bluetooth 5.4, GPS, NFC आणि USB 2.0 सपोर्टसह USB Type-C पोर्टचा समावेश आहे. तसेच, या डिव्हाइसमध्ये इन्फ्रारेड ब्लास्टर, X-axis लिनियर मोटर आणि एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप, प्रॉक्सिमिटी सेन्सर, एम्बियंट लाइट सेन्सर व इलेक्ट्रॉनिक कंपास यांसारखे सेन्सर्स दिले आहेत. याव्यतिरिक्त, धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी Vivo V80 ला IP68 आणि IP69 रेटिंग देण्यात आले आहे.

तर हे सगळे फीचर्स वाचून तुम्हाला Vivo V80 घेण्याची इच्छा असेल तर तुम्हाला १३ ऑक्टोबरची वाट पाहावी लागेल.