पॉलिनेशियन देशाच्या टोंगा बेटावर शनिवारी समुद्राखाली भीषण ज्वालामुखीचा उद्रेक झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यातून निघणारी राख आकाशात २० किमी पसरली होती. हे दृश्य लांबूनही दिसत होत. टोंगामध्ये राख आणि दगडांचे छोटे तुकडे देखील पडले. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. आता या भितीदायक दृश्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर अमेरिका आणि जपानने पॅसिफिक किनारपट्टीवरील लोकांना शक्य तितक्या किनार्‍यापासून दूर जाण्याचा सल्ला दिला आहे. एका ट्विटर युजरने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये लाटा किनारे तोडून ओलांडताना दिसत आहेत. युजरने लिहिले की, “मला ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचा आवाज ऐकू येतो, तो खूप धोकादायक वाटतो. राख आणि लहान खडे बरसत आहेत, आजूबाजूला आकाश गडद आहे.”

(हे ही वाचा: Viral Video: लग्नात नवरदेव करत होता डान्स तेव्हाच, नवरीने काढली चप्पल आणि…)

(हे ही वाचा: Photos: पार्ले-जी मधील ‘जी’ चा नेमका अर्थ तुम्हाला माहीत आहे का?)

सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला. खरं तर, हे दृश्य इतके धोकादायक आहे की कोणीही घाबरेल. सध्या या लाटांमुळे किती नुकसान झाले असून जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. टोंगा हवामान सेवांनी सांगितले की संपूर्ण टोंगामध्ये सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Volcanic eruption at sea horrible scene captured on camera video viral ttg
First published on: 16-01-2022 at 12:01 IST