Vulgar Video Viral: गेल्या अनेक वर्षांपासून महिलांवरील अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. सोशल मीडिया, वृत्तपत्रं, बातम्या यांद्वारे आपल्याला या सगळ्याबद्आदल कळतं. या गोष्टी वाचून ऐकून आपण माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही देशात महिला असुरक्षित आहेत. अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या उघडपणे फिरतात. भररस्त्यात सगळ्यांसमोर महिलांची छेड काढतात, अश्लील वर्तन करतात आणि खुलेआम फिरतात. सध्या असाच प्रकार एका तरुणीबरोबर घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हायरल व्हिडीओ (Shocking Video Viral)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक माणूस रेल्वेमध्ये खाली बसून अश्लील कृत्य करताना दिसतोय. एका तरुणीनेने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला.
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ती म्हणाली, ”जर कोणत्याही पोलिसांनी या व्यक्तीला पाहिलं, तर कृपया त्याला अटक करा – कारण त्याने सार्वजनिक ठिकाणी अतिशय घाणेरडा आणि अश्लील प्रकार केला आहे!
आज (०२/०७/२०२५) दुपारी ०२:०४ वाजता, मी आणि माझ्या मैत्रिणी कॉलेजमधून तांबरम ते चेन्नई बीचकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनने परतत होतो. तेव्हा आमच्यासमोर बसलेला एक पूर्ण नशेत असलेला पुरुष अत्यंत घाणेरड्या पद्धतीने वागत होता आणि अश्लील वर्तन करत होता.
आम्ही शांत बसलो नाही. आम्ही मदतीसाठी प्रयत्न केला. प्रथम RPF ला कॉल केला, पण कॉल लागला नाही. नंतर १३९ रेल्वे हेल्पलाइनवर कॉल केला, पण तिथे हिंदी बोलणाऱ्या ऑपरेटरला इंग्रजी समजत नव्हतं. मी इंग्रजी बोलणाऱ्याशी कॉल जोडून द्यायला सांगितलं, पण तिने कॉल ट्रान्सफर करायला नकार दिला.
यात दु:खाची गोष्ट म्हणजे, आजूबाजूचे पुरुष हे बघूनही गप्प बसले. कुणीतरी काहीतरी केलं असतं तर त्याला पुढच्या स्टेशनवर उतरवून गार्डकडे सोपवता आलं असतं. आम्ही हेल्पलाइनला कॉल करत असतानाच तो गिंडी रेल्वे स्टेशन उतरून पळून गेला.”
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @_.legalbud._ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल ५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. तसंच “त्रासदायक सार्वजनिक अश्लीलता” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तुम्ही कोचमधील इतर माणसांना का दोष देत आहात? तुम्ही त्याला पोलिसांच्या ताब्यात का दिले नाही?”, तर दुसऱ्याने “हे निराशाजनक, घृणास्पद आणि अस्वस्थ करणारे आहे. ट्रेनमध्ये अशा घटनेनंतर जनता गप्प का आहे? या माणसाला ताबडतोब अटक करून तुरुंगात टाकले पाहिजे.” अशी कमेंट केली. तर एकाने ”अशा लोकांना तिथेच फोडलं पाहिजे” अशी कमेंट केली.