Viral Video: हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कर्मचारी त्यांच्या कामात इतके कुशल असतात की, ते काम करण्याची स्वत:ची एक वेगळी ट्रिक शोधून काढतात. या ट्रिक वापरून ते आपले काम तर सोप्प करतातच, पण आपलं कौशल्यही दाखवतात. अशाप्रकारे बारमध्ये काम करणाऱ्या एका वेट्रेसचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात ती वेट्रेस दोन हातांनी बिअरचे चक्क भलेमोठे १३ ग्लास उचलताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वेट्रेस बारमध्ये बिअर सर्व्ह करताना दिसत आहे. पण, बिअरचे हे ग्लास सर्व्ह करण्यासाठी वेटर्सना खूप मेहनत घ्यावी लागतेय. कमी वेळेत अधिकाधिक ऑर्डर द्याव्या लागत असल्याने वेट्रेसची खूप धावपळ होते आहे. रेस्टॉरंटच्या किंवा बारच्या या फास्ट सर्व्हिसमुळे ग्राहकही खूश होतात आणि त्याच ठिकाणी नेहमी येतात. या व्हिडीओमध्येही एक वेट्रेस ग्राहकांना पटकन बिअर सर्व्ह करण्यासाठी एकाचवेळी अनेक ग्लास उचलतेय.
व्हिडीओमध्ये एक वेट्रेस बारच्या काउंटरवर उभी आहे आणि ती ग्राहकांना बिअर ग्लास भरून देत आहे. यासाठी तिने ग्लास गोल आकारात मांडले आहेत. जेव्हा टेबलवरील सहा ग्लास भरून पूर्ण होतात, तेव्हा ती त्या ग्लासवर पुन्हा सहा ग्लास पूर्ण भरून ठेवते. अशा प्रकारे १२ ग्लास ती बिअरने पूर्ण भरून तयार करते आणि दोन हातांनी उचलते. इतकच नाही, तर शेवटी त्यावर आणखी एक ग्लास ठेवते. अशाप्रकारे एकाच वेळी १३ ग्लास योग्यरित्या बॅलन्स करून उचलते आणि सर्व्ह करण्यासाठी घेऊन जाते. योग्य बॅलन्सबरोबरच तिने हातांची ताकदही दाखवून दिली आहे. कारण इतक्या ग्लासांचे वजन एकाचवेळी उचलणे प्रत्येकाला सहज जमते असे नाही. व्हिडीओमध्ये असे सांगण्यात आले आहे की, हे म्युनिकमधील ऑक्टोबर फेस्ट दरम्यानचे दृश्य आहे, ज्याला बिअर फेस्टिव्हल असेही म्हटले जाते.
हा व्हिडीओ @TansuYegen या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यावर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यावर एका युजरने लिहिले की, असे करण्यापेक्षा मुलीने फक्त सहा ग्लास घेतले असते आणि लगेच येऊन उरलेले सहा ग्लास घेतले असते तर काम सहज झाले असते. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, मुलगी तरुण आणि निरोगी आहे, म्हणूनच ती हे करू शकली. तर तिसऱ्या एका युजरने लिहिले की, ती जिममध्ये हातांचा व्यायाम करत असावी.