List of good qualities of a child : आचार्य चाणक्यांची धोरणे केवळ राजकारण किंवा प्रशासनापुरती मर्यादित नाहीत, तर कौटुंबिक जीवन, शिक्षण आणि मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासातही ती विशेष व महत्त्वाची मानली जातात. चाणक्य नीतीमध्ये अशी अनेक तत्त्वे सांगितली आहेत, जी आजही लोकांना योग्य दिशेने मार्गदर्शन करतात. चाणक्यांनी विशेषतः मुलांचे संगोपन आणि त्यांच्यावर होणाऱ्या संस्कारांविषयी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

चाणक्य नीतीनुसार, मुलाची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याचे चारित्र्य आणि गुण. या गुणांमुळे त्यांना समाजात आदर मिळतो आणि त्यांच्या पालकांना त्याचा अभिमान वाटतो. आचार्य चाणक्यांचा असा विश्वास आहे की, जर मुलांमध्ये लहानपणापासूनच चांगले संस्कार आणि सकारात्मक सवयी रुजवल्या, तर ते केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्थान बनतात. चला, चाणक्य नीतीनुसार मुलांमध्ये कोणते गुण असले पाहिजेत याबद्दल जाणून घेऊया.

ज्ञान

चाणक्यांनुसार ज्ञान व हुशारी ही माणसाची सर्वात मोठी शक्ती आहे. ज्या मुलामध्ये शिकण्याची इच्छा व योग्य निर्णय घेण्याची क्षमता असते; अशी मुले जीवनातील यशाचा मार्ग सहजपणे गाठतात. त्यांच्या कारकिर्दीत येणाऱ्या आव्हानांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतात. चाणक्याचा विश्वास आहे की, हुशार मुले केवळ स्वतःचेच भविष्य उज्ज्वल करत नाहीत. तर समाजात त्यांच्या पालकांची प्रतिष्ठाही उंचावतात.

संस्कार

आचार्य चाणक्य म्हणतात संस्कार ही सर्वात मोठी संपत्ती आहे. ज्या मुलांमध्ये वडीलधाऱ्यांबद्दल आदर, शिस्त, कुटुंबाप्रती जबाबदारीची भावना असते. ही मुले कुटुंब एकत्र ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अशी मुले घरात शांतता, आनंद टिकवून ठेवतात आणि समाजात कुटुंबाला सन्मान मिळवून देतात. म्हणूनच, चाणक्याने मुलांमध्ये उत्तम संस्कार रुजवण्यावर विशेष भर दिला पाहिजे.

प्रामाणिकपणा

चाणक्याच्या मते, जी मुले खोटेपणा, फसवणूक, कपटीपणापासून दूर राहतात. ती समाजात स्वतःची ओळख निर्माण करतात. प्रामाणिकपणा व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व मजबूत करतो आणि त्यांना लोकांचा विश्वास संपादन करण्यास मदत करतो. अशा मुलांना जीवनात यशस्वी होण्याच्या अधिक संधीही मिळतात. यामुळेच त्यांच्या पालकांनाही समाजात आदर मिळतो.

दयाळूपणा

आचार्य चाणक्य म्हणतात की, दयाळू व मदत करणारी मुले त्यांच्या पालकांसाठी भाग्यवान मानली जातात. जी मुले गरजूंना मदत करतात आणि इतरांबद्दल संवेदनशील असतात; ती सुखी व शांततापूर्ण जीवन जगतात. अशा मुलांना त्यांच्या पालकांचा आशीर्वादही मिळतो आणि त्यांच्या वागणुकीमुळे त्यांना समाजात आदर मिळतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)