Premium

Video: शॉर्टकट जीवावर बेतला! नागपूर-तुळजापूर महामार्गावर काळजाचा ठोका चुकावणारा अपघात; पती-पत्नी हवेत उडून…

Shocking video: ‘अतिघाई संकटात नेई’ असे म्हणतात. याचाच प्रत्यय वर्धा जिल्ह्यातील नागपूर-तुळजापूर महामार्गावरील पवनार परिसरात आला आहे.

Wardha nagpur tuljapur highway Car and Bike Accident husband and wife dead
नागपूर-तुळजापूर महामार्ग अपघात

Viral video: ‘अतिघाई संकटात नेई’ असे म्हणतात. याचाच प्रत्यय वर्धा जिल्ह्यातील नागपूर-तुळजापूर महामार्गावरील पवनार परिसरात आला आहे. जगात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. असाच एक अपघात शॉर्टकट मारताना झाला आहे. आणि हाच शॉर्टकट जीवावर बेतला आहे, या अपघाताचा सीसीटिव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अपघतात दोघेही पती-पत्नी हवेत उडाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुढे जाण्याच्या नादात वाहनांना ओव्हरटेक करायला जातात. वेळ वाचवण्यासाठी उलट्या बाजूनं वाहने चालवतात, पण कधी कधी हा प्रयत्न अंगलट येतो. असाच अपघात वर्ध्यामध्ये झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका पती-पत्नीनं महामार्गावरुन प्रवास करताना शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला आणि हाच शॉर्टकट त्यांच्या अंगलट आला. समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या कारने त्यांना अक्षरश: एवढ्या जोरात उडवलं की ते दोघंही उंच हवेत उडाले.

चुकीच्या दिशेने गाडी चालवत महामार्गावरील दुभाजक ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना काळजाचा ठोका चुकावणारा हा अपघात घडला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> चोरी आली अंगलट! चाकूचा धाक दाखवून मोबाइल चोरण्यासाठी आले आणि घडली जन्माची अद्दल, थरारक घटनेचा VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा.या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wardha nagpur tuljapur highway car and bike accident husband and wife dead shocking accident video viral on social media srk

First published on: 03-12-2023 at 10:14 IST
Next Story
आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सव! देशभरातील कलाकारांनी घेतला सहभाग; सुदर्शन पटनायक यांनी शेअर केला खास Video