जमिनीवर झोपलेल्या मुलीच्या गळ्याशी विळखा टाकून बसला होता नाग! दोन तास हलला देखील नाही

मुलगी घरात साखरझोपेत असताना अचानक नाग घरात शिरला आणि तब्बल दोन तास तिच्या गळ्याशी फणा काढत डोलत राहिला.

wardha-snake-wrapped-around-the-girls-neck

महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडलीय. घरात साखरझोपेत असलेल्या एका लहान मुलीच्या अंथरूणात साप शिरला आणि तो काही वेळ नव्हे तर तब्बल दोन तास चक्क फणा काढत त्या मुलीच्या गळ्याशी डोलत होता. दोन तासानंतर या चिमुकल्या मुलीने जेव्हा तिच्या गळ्याशी कोब्रा नागाला पाहिलं त्यानंतर या नागाने तिच्या हाताला चावा घेतला. सध्या या मुलीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना घडल्यानं सर्वांची भंबेरी उडाली आहे.

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात येणाऱ्या बोरखेडी कला या गावात ही घटना घडलीय. सात वर्षीय परी पद्माकर गडकरी आणि तिचे आई-वडील रात्री अकरा-बाराच्या सुमारास घरात झोपी गेली. रात्री १२ च्या सुमारास त्यांच्या घरात कोब्रा नाग शिरला आणि मुलगी परीच्या गळ्याच्या बाजूला फणा काढत डोलत होता. गाढ झोपेत असताना अचानक नागाच्या फुसकारण्याचा आवाज येत असल्याने शेजारी झोपलेली आई जागी झाली. जमिनीवर झोपलेल्या मुलीच्या गळ्यात गुंडाळलेला नाग पाहून आई-वडीलांना धक्काच बसला.

झोपलेल्या मुलीच्या गळ्यात साप गुंडाळला. मोठ्या कष्टाने साप काढला गेला, पण वाटेत शेवटी सापाने त्या मुलीला चावले. सध्या या चिमुकलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरातील लोकांचे म्हणणे आहे की, साप सुमारे दीड तास गळ्यात गुंडाळत आहे. नंतर मुलीला वाचवण्यासाठी साप पकडणाऱ्याची मदत घेण्यात आली. आजुबाजुला सुरू असलेल्या गोंधळामुळे मुलगी सुद्धा झोपेतून जागी झाली. पण पालकांनीच तिला ‘हलू नको बेटा स्तब्ध रहा ! ‘ असाच सल्ला दिला. मुलगी घाबरली नाही , शांत पडून राहीली. रात्रीत लगेच सर्पमित्रांना बोलविण्यात आले. रात्री बारा वाजता गड्याला गुंडाळी घालून असणारा साप मध्यरात्री दोन वाजेपर्यंत राहिला.

आणखी वाचा : आऊट ऑफ कंट्रोल झाले नवरी-नवरदेव; डान्स करता करता पडले आणि मग….

त्याचवेळी शेजाऱ्यांनी सर्प मित्राला बोलवून घेतलं होतं. पण याला खूपच उशिर झाला. ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची गर्दी वाढली. त्यामुळे सापही जागचा हालत नव्हता. तब्बल दोन तास चाललेला हा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. हे दृश्य पाहून सर्वांच्याच अंगावर शहारे येत होते. शेवटी रात्री २ च्या सुमारास त्या सापाने मुलीच्या गळ्यातून विळखा सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. परंतु सापाचा काही भाग मुलीच्या पाठीखाली दबून असल्याने त्या अतिशय विषारी सापाने अखेर त्या मुलीच्या हाताला चावा घेतला आणि दिसेनासा झाला.

आणखी वाचा : स्वप्न म्हणा की सत्य.. पण निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार पाहून तुम्हीही म्हणाल Wow!

त्यानंतर त्या मुलीला ताबडतोब सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी नेलं. सध्या ती मुलगी सेवाग्राम येथे अतिदक्षता विभागात उपचार घेतेय. ही घटना मनाला चटका लावणारी तर ठरलीच पण तितकीच थरकाप उडविणारी देखील होती. या घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Wardha snake wrapped around the girls neck prp