सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हत्तीचे व्हिडीओ, माकडाचे व्हिडीओ व्हायरल होत असताता. अनेकदा माकड मानवी वस्तीमध्ये घुसून धूडगूस घालतात. माकड अनेकदा लोकांवर हल्ला करताना दिसतात. सध्या असाच एका माकडाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एका महिलेवर माकडांनी हल्ला केला आहे. माकडांनी महिलेचे अक्षरश: केस ओढले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये

इंस्टाग्रामवर @bewar_lives_news नावाच्या पेजवर माकडांच्या हल्ल्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अजमेरमध्ये अंगणात बसलेल्या एका महिलेवर दोन माकडांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना एका व्हायरल व्हिडिओमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये माकडं मागून तिच्याजवळ आले आणि तिचे केस इतक्या आक्रमकपणे ओढले की, तिच्या हातातील प्लेट जमिनीवर पडली. महिला जोरजोरात ओरडताना दिसत आगे. माकड एवढ्या ताकदीने महिलेचे केस ओढत होते की महिला खुर्चीवरून जवळ जवळ खेचली गेली आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch 2 monkeys in ajmer grab woman by her hair clip sparks shock among netizens snk