भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, नैऋत्य मान्सून राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या अनेक भागात पोहोचला आहे. या वर्षी, मान्सूनने सामान्य आगमन तारखेच्या सहा दिवस आधी संपूर्ण देश व्यापला. दरम्यान राजस्थानच्या काही भागांमध्ये सळधार पाऊस आणि सोसाट्याचा वाराने चांगलेच झोडपले आहे. दरम्यान श्री गंगानगरमधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. प्रवाशांना त्यांच्या कारवर (उच्च विद्युत दाब सुरु असलेला) हाय-व्होल्टेजचा विजेचा खांब पडला पण प्रवाशांचा जीव थोडक्यात बचनावला. वृत्तानुसार, ही घटना २ जुलै रोजी घडली आणि कोणालाही दुखापत झाली नाही.

एका प्रेक्षकाने रेकॉर्ड केलेल्या या घटनेचा व्हायरल व्हिडिओमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहतो आहे. रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक पांढरी कार दिसत आहे. शेजारून लाल रंगाच्या कारवर जात असताना अचानक बाजूचा विजेचा खांब कारवर कोसळतो. आधीपासून रस्त्यावर उभ्या असलेल्या पांढऱ्या कारच्या अगदी बाजूलाच ही कार थांहते.मागून येणारा एक स्कूटरवरील व्यक्ती देखील थोडक्यात बचावतो. तो माणूस धोका टाळण्यात लगेच त्याची गाडी मागे घेतो. व्हिडिओ जसजसा पुढे जात आहे, तसतसा एक माणूस पांढऱ्या कारमधून बाहेर पळत असून शेडखाली आश्रय घेताना दिसतो.

Shivneri Sunadri News
Shivneri : विमानातील हवाई सुंदरी प्रमाणे आता शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’, भरत गोगावलेंची घोषणा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
palghar highway potholes marathi news
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील महामार्ग खड्डेमय, दोन दिवस झालेल्या पावसात बुजवलेले खड्डे उख़डले, खड्ड्यांमुळे होणाऱ्या कोंडीने रस्ते प्रवास नकोसा
Mumbai Rain | Maharashtra Rain| Mumbai Rain Updates,
मुसळधार पाऊस, दोन तास लोकल खोळंबली; महिला प्रवाशांनी कुठे उरकायचा नैसर्गिक विधी?
palm beach traffic jam youth death
पामबीचवर मुलाच्या मृतदेहाजवळ पालकांचा आक्रोश, वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका पोहोचण्यास विलंब
Huge snake enters railway station
बापरे! रेल्वे प्लॅटफॉर्मवर दिसला भलामोठा साप; प्रवाशांचा उडाला थरकाप अन् पुढे काय झालं तुम्हीच पाहा VIDEO
Kalwa-Airoli Project, Mumbai, Kalwa-Airoli,
मुंबई : साडेसात वर्षांत कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्पाचे केवळ ४६ टक्के काम पूर्ण
ST diesel buses will start in October mumbai news
ऑक्टोबरमध्ये एसटीच्या साध्या डिझेल बस दाखल होणार

इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना jist.news ने लिहिले की, “मंगळवारी राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये उच्च व्होल्टेज पॉवर लाइन पोल एका कारवर पडला. सुदैवाने प्रवासी सुखरूप बचावले.”

एप्रिल २०२२ मध्येही अशीच घटना घडली होती; बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलाचा खांब चालत्या वाहनावर पडल्याने किमान दोन जण जखमी झाले. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडातील सेक्टर-१२२ येथील चौकात ही घटना घडली.

आसाम, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि मणिपूरसह ईशान्येकडील राज्यांमध्ये सतत पाऊस पडत आहे. आसाममधील पूरस्थिती मंगळवारी आणखीनच बिघडली, २८ जिल्ह्यांमधील ११.३४ लाख पेक्षा जास्त लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मृतांचा आकडा ३८ वर पोहोचला आहे.