सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मन जिंकणारे असतात तर काही अंगावर काटा आणणारे असतात. कधी वन्य प्राणी शिकार करताना दिसतात तर कधी रस्त्यावर फिरणारे प्राणी माणसांवर हल्ला करताना दिसतात. कुत्रा, गायी म्हैस, रेडा अशा प्राण्यांचे माणसांवर हल्ला करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही प्राण्यांचे व्हिडीओ असे असतात जे पाहून अंगावर काटा येतो. सध्या अशाच रस्त्यावर भांडणाऱ्या गायींचा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दोन गायींच्या भांडणात रस्त्यावरील तरुणीं देखील हल्ल्यात सापडल्या आहेत.

@gharkekalesh नावाच्या एक्स खात्यावर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सुरुवातीला काही तरुणी रस्त्यावरील एका दुकानाबाहेर उभ्या असलेल्या दिसत आहे. रस्त्यावर वाहणांची ये-जा सुरु आहे. अचानक दोन गायी भांडत भांडत तिथे येतात. दोन गायींच्या भांडणामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन मुली भरडल्या गेल्या आहेत. एकमेकींना शिंगाने मारणाऱ्या गायी भांडताना दिसत आहे. गाय जोरात जमिनीवर आदळते. आसपासचे लोक धावत येतात आणि दोन्ही मुलींना ओढून बाहेर काढतात. व्हायरल व्हिडीओ सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे.

kalyan shilphata road marathi news
मेट्रोच्या कामांमुळे शिळफाटा रस्त्यावरील अवजड वाहने पर्यायी रस्त्यावरून वळविण्याच्या हालचाली
voter ID cards, Shilphata road,
कल्याणमध्ये शिळफाटा रस्त्यावर मतदान ओळखपत्रांचा ढीग
AAP Finds Errors in Rs 100 Crore Road Works in Kolhapur, aam aamdmi party, AAP Pressures Municipal Officials for Accountability Road works, Kolhapur Municipal Officials, Errors in Rs 100 Crore Road Works,
कोल्हापुरातील १०० कोटीच्या रस्त्यांचा ‘आप’ने केला पंचनामा; अधिकारी धारेवर; गटार चॅनेल गायब
Little boy plays with stray dogs on waterlogged roads of Mumbai
रस्त्यावर साचलेल्या पाण्यात भटक्या कुत्र्यांसह खेळतोय चिमुकला, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू
Thane, thane residents, Unremoved Tree Debris, Thane Residents Face Hazards from Unremoved Tree Debris, cut tree waste, thane municipal corporation, majiwada, minatai Thackeray chowk thane,
ठाण्यात हरित कचऱ्याची डोकेदुखी; रस्त्यावर जागोजागी छाटलेले वृक्ष पडून
bhaindar, woman suicide
भाईंदर: लग्न मोडल्याने तरुणीची आत्महत्या, ९ व्या मजल्यावरून उडी मारली
pune rains
“समुद्र नसल्याची पुणेकरांना खंत, म्हणून भाजपाने…”, पहिल्या पावसानंतरची दयनीय स्थिती पाहून जयंत पाटलांचा टोला
Excavation of concrete roads in Aare Dudh Colony mumbai
आरे दूध वसाहतीत काँक्रीट रस्त्यांचे खोदकाम

हेही वाचा – मोदींनी उमेदवारी अर्ज भरताच वाराणसीत गाड्यांमध्ये पकडले गेले EVM? भाजपावर होतेय टीका पण Video मध्ये लपलंय काय हे पाहा

एका युजरने लिहिले, “ते व्यक्ती फार शुर आहेत. लाल आणि पिवळा टीशर्ट घातलेला माणूस खरोखर शूर आहे!” दुसऱ्याने लिगिले “अरे भितीदायक!! सध्या भटक्या गायींची दहशत खूप वाढली आहे. त्यांच्यापासून सावध रहा. आसपासच्या लोकांनी धैर्य दाखवले. मस्त!! ” आणखी एका वापरकर्त्याने सांगितले, “मुलींना वाचवणाऱ्या व्यक्तीचे अभिनंदन, ते स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार न करता मदतीला धावून आले, मला आशा आहे की मुली सुरक्षित आहेत.”

हेही वाचा – तळ्याकाठी पाणी पीत होता हत्ती, पाण्यात लपलेल्या मगरीने अचानक केला हल्ला, जबड्यात पकडली सोंड अन्…थरारक Viral Video

काही आठवड्यांपूर्वी, एका बैलाने दिल्लीतील एका मोबाईलच्या दुकानात झेप घेतली होती. त्यामुळे आसपासच्या सर्वांमध्ये घबराट पसरली होती. गोंधळ असूनही बैल नेहमीसारखा शांत दिसत होता.