scorecardresearch

Premium

चालत्या बूलेट ट्रेनमध्ये कुस्तीपटूंची WWE स्टाइलमध्ये मारामारी; प्रवाशांनी लुटाला सामन्याचा आनंद, पाहा Viral Video

सध्या एका चालत्या बूलेट ट्रेनमध्ये कुस्तीचा व्हिडीओ समोर आला आहे.

Watch In Japan passengers on a bullet train enjoy WWE-style match
चालत्या बूलेट ट्रेनमध्ये कुस्तीपटूंची WWE स्टाइलमध्ये मारामारी (फोटो सौजन्य- फ्रिपीक)

WWE Style Match On Bullet Train: कुस्ती किंवा रेसलिंग ऐकले तुमच्या मनात काय येतं? एक असा आखाडा जिथे दोन पहिलवान एकमेकांवर डावपेच करत लढतात. पण तुम्ही कधी त्यांना आखाड्याऐवजी बुलेट ट्रेनमध्ये पाहिली आहे का? नाही ना. पण सध्या एका चालत्या बूलेट ट्रेनमध्ये कुस्तीचा व्हिडीओ समोर आला आहे. या आगळ्या वेगळ्या कुस्तीचा सामना सूदूर जापानमध्ये एक खचाखच भरलेल्या बुलेट ट्रेनमध्ये घडला आहे जिथे अर्धा तास पहिलवान एकमेकांसह लढताना दिसत आहे तेही WWE स्टाइलमध्ये..

समोर आलेल्या माहितीनुसार, या आगळ्या वेगळी कुस्ती चालत्या बूलेट ट्रेनमध्ये झाली आहे असे समजते. जपानमध्ये डीटीसी प्रो-रेसलिंग(Tokyo-based DDT Pro-Wrestling) ने या स्पर्धेचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे फक्त अर्ध्या तासाच या स्पर्धेची ७५ तिकीटे विकली गेली, ज्याचे आयोजन टोकियो आणि नागोयो दरम्यान प्रती तास १८० मैल वेगाने धावणाऱ्या नोजोमी शिंकानसेन बुलेट ट्रेनमध्ये आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान, प्रवाशांनी सामनाच्याचा आंनद लुटला एवढचं नाही तर फोनमध्ये हे दृश्य रेकॉर्ड देखील केले.

Noida Police Shares Video Of python rescue
धावत्या ट्रकच्या केबिनमध्ये शिरला भलामोठा अजगर, पोलिसांच्या सतर्कतेमुळे बचावला ड्रायव्हर, थरारक VIDEO पाहाच
Delhi Metro viral video
चक्क धावत्या मेट्रोमध्ये आजोबांनी बिडी पेटवली अन्…, VIRAL व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया…
Delhi Metro Viral Video
Viral Video : मेट्रो ट्रेनमध्ये बॅक फ्लिप मारायला गेला अन् जन्माची अद्दल घडली, प्रवासी आयुष्यभर विसरणार नाही
Japanese woman files complaint after Singapore eatery charges Rs 56k for crab dish
बापरे! एका खेकड्याची किंमत लावली ५७ हजार; महिलेनं हॉटेल मालकाविरोधात पोलिसांत केली तक्रार

हेही वाचा – भुकेल्या माकडांनी भातावर मारला ताव, तरुणीने हाताने भरवला घास; पाहा मजेशीर व्हायरल व्हिडीओ

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, डब्ल्यूडब्ल्यूई स्टाइल सामन्याचे आयोजन टोकियामध्ये डीडीटी प्रो- रेसलिंग द्वारे ७५ प्रवाशांनी भरलेलेल्या कोचमध्ये केले होते. मिनोरू सुजुकी (Minoru Suzuki) आणि संशिरो ताकागी (Sanshiro Takagi)यांच्यामध्ये ही लढत सुरू झाली. लढाई सुरु असताना ३० मिनिटांमध्ये सर्व तिकिट विकले गेले. त्यांनी सोमवारी टोकियो ते नागोयो (Tokyo to Nagoya) पर्यंत शिंकानसेन बुलेट ट्रेनमध्ये (Shinkansen bullet train) लढत केले आणि या लढतीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – जिद्दीला सलाम! दिवसभर फार्मा कंपनीमध्ये करते जॉब, ऑफिस सुटताच विकते पास्ता, ‘या’ तरुणीची प्रेरणादायी कथा एकदा वाचा

द टेलिग्राफनुसार, हा सामाना अर्धा तास सुरू होता. कुस्ती हा जपानमधील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी आहे ज्यामध्ये हल्क होगनपासून कर्ट एंगलपर्यंत अनेक मोठ्या कुस्तीपटूंचे नाव सामाविष्ट आहे. गेल्या काही वर्षांणध्ये पारंपारिक खेळ सुमो कुश्तीला पर्यटकांची पसंती मिळाली आहे. हे पाहण्यासाठी मोठ्या संख्ये विदेशी पर्यटक जपानामध्ये येतात. गेल्या महिन्यात टोकियामध्ये एका रेस्टॉरंटमध्ये दुपारच्या जेवणाच्या सामान्याचे आयोजन केले होते. जिथे सूमो पहिलवानांनी पर्यटकांचे भरपूक मनोरंजन केले. त्यानंतर खेळाडूंसह सेल्फी देखील घेतली आणि निवृत झालेल्या पहिलावानसह प्राचीन कला असलेल्या सुमोची लढत करण्यासाठी सुमो पहिलावानांसारखा पोशाखही परिधान केला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Watch in japan passengers on a bullet train enjoy wwe style match snk

First published on: 21-09-2023 at 19:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×