scorecardresearch

Video: मुंबईच्या लोकलमध्ये अशी होते प्रवाशांची अवस्था; नेटकरी म्हणाले ‘आमच्यासोबतही…’

Mumbai Local Viral Video: लोकल ट्रेनमध्ये वारंवार प्रवास करताना मुला-मुलींना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते ते या व्हिडीओ मधून दाखवण्यात आलं आहे.

mumbai local video
photo: social media

Mumbai Local Train Viral Video: मुंबई लोकल ट्रेनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवाशांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहून लोक हसत आहेत आणि शेअरही करत आहेत. मुंबई लोकल ट्रेनमध्ये अनेकदा जास्त गर्दी असते, त्यामुळे लोक खूप खूप कंटाळतात. हा व्हिडीओ पाहून आपल्यासोबतही असे अनेक वेळा घडले आहे, असं अनेकजण सांगत आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिलांमध्ये जागेवरून अनेकदा भांडण होतात. तर मुलांच्या डब्यातही एकमेकांच्या अंगाच्या दुर्गंधीने लोक हैराण होत असतात. हा व्हिडीओ मुंबई सिटी नावाच्या पेजने शेअर केला आहे, जो खूप मजेशीर आहे. लोक व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. त्याचवेळी ते यावर प्रतिक्रिया देखील देत आहेत. आपल्यासोबतही असे अनेक वेळा घडले आहे, असे अनेकजण सांगत आहेत.

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: ‘या’ देशात फक्त ४० मिनिटांची रात्र असते; ठिकाणाचे नाव वाचून तुम्हीही थक्क व्हाल)

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या

हा व्हिडीओ पाहून युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘असं अनेकदा माझ्यासोबत देखील घडले आहे’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘काही लोक आंघोळ करून देखील येत नाहीत.’ त्याचवेळी, एका यूजरने म्हटले की, ‘लेडीज कोचमध्येही असेच होते.’ हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे आणि तो शेअरही करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 16:57 IST