रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केल्यानंतरचा आजचा तिसरा दिवस आहे. युक्रेन युद्धामध्ये रशियन सैन्याची आगेकूच सुरूच असून शनिवारी सलग तिसऱ्या दिवशीही युक्रेनची राजधानी किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरु आहेत. त्याचबरोबर किव्हच्या वायव्येस असलेला मोक्याचा विमानतळ ताब्यात घेतल्याचा आणि या भागात पॅराशूटच्या साहाय्याने सैनिकांना (पॅराट्रुप्स) उतरवल्याचा दावा रशियन लष्कराने केला.

नक्की वाचा >> Ukraine War: एका बेटासाठी १३ जवान शहीद; रशियन जहाजाला पाहून म्हणाले होते “इथून…”

आम्ही नागरी वस्त्यांवर हल्ला करत नसल्याचा दावा रशियाकडून केला जात असता तरी सत्य परिस्थिती वेगळीच असल्याचं दिसतंय. युक्रेनच्या रस्त्यावर रशियन सैन्याचे रणगाडे सैरावैरा धावत असून शहराबाहेर पडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या गाड्यांना ते थेट चिरडताना दिसताय. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल

नक्की वाचा >> Ukraine War CCTV Video : रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात सायकलस्वारावर पडला बॉम्ब

वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार रशियाने युक्रेनची राजधानी किव्हवर हल्ला केला असून भीतीने नागरिकांनी भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये आश्रय घेतला आहे, तर काही नागरिक पश्चिमात्य देशांमध्ये आश्रयाला जात आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की साधं रस्त्यावर चालणही शक्य नाहीय. अशात काहीजण गाड्यांमधून शहर सोडण्याच्या प्रयत्नात आहेत. पण वेगाने जास्तीत जास्त भूप्रदेश ताब्यात घेण्याच्या उद्देशाने आक्रमक झालेले रशियन सैन्य वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला लक्ष्य करत आहे. असाच एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये एका रशियन रणगाड्याने एका धावत्या गाडीचा चिरडल्याचं दिसत आहे.

नक्की पाहा >> Video: आजींनी रशियन सैनिकाला भरचौकात झापलं; नंतर त्याच्या हातावर सूर्यफुलाच्या बिया टेकवत म्हटल्या, “या खिशात ठेव म्हणजे…”

ब्रिटीश मंत्री असणाऱ्या हेनरी बोल्टन यांनी हा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर केलाय. “युक्रेनच्या लोकांना स्वातंत्र्य देण्याची रशियाची ही संकल्पना आहे का हे पुतिन यांनी सांगावं. खरं तर तुम्हाला लोकांची काहीच नाहीय. ना युक्रेनच्या ना रशियाच्या आणि अगदी तुमच्या लष्करातील सैनिकांच्या जीवाचीही तुम्हाला काळजी नाहीय. तुम्हाला फक्त रशियन सम्राज्य साकारण्याच्या तुमच्या वेड्या विचारसणीची चिंता आहे,” असं बोल्टन हा व्हिडीओ शेअर करत म्हणालेत.

नक्की वाचा >> Ukraine War: त्या २४ वर्षीय तरुणीची Instagram स्टोरी जगभरात चर्चेचा विषय; ‘पुतिन कनेक्शन’मुळे स्क्रीनशॉट व्हायरल

हा व्हिडीओ एका रहिवाशी इमारतीच्या खिडकीतून काढण्यात आलाय. इमारतीसमोरील रस्त्यावरुन वेगाने जाणाऱ्या एका गाडीला अडवण्यासाठी समोरुन येणारा रशियन रणगाडा थेट गाडीला चिरडताना दिसतोय. समोरचं हे दृष्य पाहून व्हिडीओ शूट करणाऱ्यांबरोबरच त्याच्या आजूबाजूचेही मोठ्या ओरडताना, किंकाळताना दिसत ऐकू येत आहे.

नक्की पाहा >> Photos: व्लादिमिर Vs वोलोडिमिर! युक्रेन युद्धात पुतिन यांना नडणारा ‘स्टॅण्डअप कॉमेडियन’

कारवर झालेल्या या हल्ल्यानंतर गाडीमधील म्हतारा चालक जिंवत असल्याची माहिती समोर आलीय. या चालकाला गाडी दणकट असल्याने किरकोळ जखमा झाल्याचं सांगण्यात येत आहे.