लोकल ट्रेनचा प्रवास दिवसेंदिवस अशक्य होत चालला आहे. मुंबईतील कल्याण जंक्शन रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीसारखी स्थिती दर्शविणारा एक व्हिडिओ व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक महिला एकमेकांना धक्का देत लोकल ट्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण प्लॅटफॉर्म प्रवाशांनी भरलेला दिसत आहे.

व्हिडिओ शेअर करताना, एक X वापरकर्ता चिराग बडजात्याने लिहिले, “फ्रेममध्ये २ कार असलेल्या प्रत्येक अटल सेतू व्हिडिओसाठी, १० हजार लोक मुंबई लोकलमध्ये जागा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अत्यंत खेदजनक आणि समाजातील प्रचंड असंतुलन आहे.

Central Railway, CSMT Local,
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांचे हाल; सीएसएमटी लोकलची धाव परळ, कुर्ल्यापर्यंत
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
European tourism, expensive,
डोंबिवलीतील कुटुंबाला युरोपचे पर्यटन महागात पडले
The puppy will cry after the owner's scream
“आई मला ओरडू नको…” मालकिणीचा ओरडा खाऊन श्वानाच्या पिल्लाला आलं रडू , VIDEO पाहून पोटधरून हसाल
women in Mumbai Bhandup chawl dance so gracefully on marathi song
मुंबईच्या चाळीतील महिलांनी केला तुफान डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “बाईपण भारी देवा”
ankush choudhary post on mumbai city and announces his new drama play
“५० वर्षे मुंबईत राहतोय, गिरणगावात मोठा झालो, पण…”, अंकुश चौधरीच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाला, “ही अस्वस्थता…”
Train Couple Intimate
हा तर निर्लज्जपणाचा कळस! धावत्या ट्रेनमध्ये कपलचे अश्लील चाळे; प्रवाशांसमोर केले असे काही घाणेरडे कृत्य की..; VIDEO व्हायरल
Regency Anantam Water Cut Issue
डोंबिवलीतील हाय प्रोफाईल गृहसंकुल प्रकल्पात पाण्याचा खडखडाट, घरं खरेदी केलेल्या लोकांची निराशा

हेही वाचा – “ही दोस्ती तुटायची नाय!”, पाण्यात वाहून जाणाऱ्या मित्राला वाचवण्यासाठी कुत्र्याने पाण्यात मारली उडी, पहा थरारक व्हिडिओ

व्हिडिओने प्लॅटफॉर्मवर १०,०४,०००पेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले आहेत. व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना, एका वापरकर्त्याने लिहिले की, “मुंबई लोकल ट्रेन नेहमीच खचाखच भरलेल्या असतात कारण किनाऱ्यालगतच्या शहराच्या अरुंद लेआउटमुळे रेल्वे मार्गांचा विस्तारणे कठीण होते.”

दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, “तेच लोक रेल्वे/मेट्रोच्या विस्ताराला विरोध करतात, एवढी गर्दी का आहे याबद्दल रडतात आणि हेच चक्र भारतात सुरू आहे.”

“यार या मुंबईच्या लोकल खूप गुदमरल्या आहेत, मी त्यात खूप प्रवास केला आणि मुंबईत प्रवास करतानाचा त्रास खरा आहे,” तिसऱ्या वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “एक चूक अन् खेळ खल्लास!” महाकाय अजगराने विळख्यात जखडले तरी हसतोय हा तरुण, पहा थरारक Viral Video

मे महिन्यात अशाच एका घटनेने इंटरनेटचे लक्ष वेधून घेतले होते. व्हायरल व्हिडिओमध्ये मुंबईतील एका रेल्वे स्थानकावर प्रचंड धुळीचे वादळ आणि पावसामुळे गोंधळ उडाला होता. व्हिडीओमध्ये प्रवासी ट्रेन पकडण्यासाठी एकमेकांना ढकलत असल्याचेही चित्रीत झाले आहे.