scorecardresearch

मुक्या जीवाने राखली भाकरीची जाण, आजारी आजीच्या भेटीला आलेल्या वानराचा हृदयस्पर्शी Video पाहाच

असं म्हणतात की जो आपणाला गरजेला मदत करतो, भुक लागल्यावर अन्न देतो त्याचे उपकार आपण कधीच विसरत नाही

old woman video
सध्या सोशल मीडियावर वानराचा असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. (Photo : Twitter)

असं म्हणतात की जो आपणाला गरजेला मदत करतो, भुक लागल्यावर अन्न देतो त्याचे उपकार आपण कधीच विसरत नाही. शिवाय त्या व्यक्तीच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी आपण त्यांच्या वाईट प्रसंगात पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न करतो. मग माणूस असो वा प्राणी ते आपल्यावर उपकार करणाऱ्याला कधीच विसरत नाहीत.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. कारण, रोज भाकरी खायला देणारी वृद्ध आजी आजारी पडल्यावर तिला भेटण्यासाठी एक वानर चक्क घरात येतो आणि त्या आजीला पाहून तो खूप अस्वस्थ झाल्याचं व्हिडीओत होतो. काही सेकंदांच्या या व्हिडिओने लोकांना प्राण्यांमधील प्रामाणिकपणाची आणि उपकाराची परतफेड करण्याच्या वृत्तीचे दर्शन घडवलं आहे.

हेही पाहा- दोन तोंड, तीन पायांचा ‘हा’ कसला विचित्र प्राणी? व्हायरल Video पाहून नेटकरी झाले थक्क

म्हाताऱ्या आजीला मारली मिठी –

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक म्हातारी आजी बेडवर झोपली आहे आणि एक वानर तिच्या शेजारी येऊन बसतो. त्यांच्या आजूबाजूलाही काही लोकही उभे असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. यावेळी वानर म्हाताऱ्या आजीच्या पोटावर चढतो तर कधी तिच्या डोक्यावरुन मायेने हात फिरवतो. शिवाय अनेकवेळा तो आजीला मिठीही मारताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हा व्हिडिओ @ravikakarara नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “ही वृद्ध आजी रोज सकाळी त्या वानराला भाकरी द्यायची, आजारपणामुळे तिला दोन दिवस भाकरी देता येत नव्हती, त्यामुळे वानर स्वत: तिच्याकडे जाऊन तब्यतीची विचारपूस करायला आला आहे.”

हेही पाहा- फळे, भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजारात जाता? तर मग ग्राहकाच्या फसवणूकीचा हा Video बघाच

व्हायरल होणारा हा ३७ सेकंदांचा व्हिडिओ पाहून अनेक लोक आश्चर्यचकित झाले आहेत. तर अनेकांनी या वानराचं कौतुक केलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘ही आमची संस्कृती आहे, प्रत्येक गोष्टीत देव दिसतो, फक्त मन शुद्ध असावे.’ दुसर्‍या यूजरने लिहिले की, “ही कथा खरी असेल किंवा नसेल, पण भावना अगदी खरी आहे.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, “हा व्हिडिओ लोकांच्या हृदयाला स्पर्शून गेला.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 17:40 IST