सध्या सोशल मीडियावर विमान प्रवासादरम्यानचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकतेच एका विमान प्रवासादरम्यान भारतीय प्रवाशांमध्ये झालेल्या भांडणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मात्र, आता एका विमान पायलटचा खूप भन्नाट आणि मनोरंजक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अनेकांना आवडला असून या विमानातील पायलटने प्रवाशांना ज्याप्रकारे सूचना दिल्या आहेत, ते पाहून अनेकांनी पायलटचे कौतुक केलं आहे.

हेही पाहा- Video: भारतात सध्या कशाचा ट्रेंड सुरु आहे? दोन चिमुकल्यांनी डान्सद्वारे दिलेलं भन्नाट उत्तर पाहिलत का?

central railway started facility of providing cheap food to passengers at 100 stations
प्रवाशांना खुषखबर! रेल्वे देतेय स्वस्तात जेवण; जाणून घ्या कोणत्या स्थानकावर सुविधा… 
pune airport marathi news, pune airport no facility marathi news,
पुणेकरांचा हवाई प्रवास ठरतोय ‘वाऱ्यावरची वरात’!
indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!
man receives rs 7 crore bill after booking uber auto ride worth rs 62 see viral video
६२ रुपयांना बुक केली उबर ऑटो, अन् बिल आलं चक्क ७.५ कोटींचे; ग्राहकाबरोबर नेमक काय घडल? वाचा

विमान प्रवासादरम्यान क्रू मेंबर्स अनेकदा विमान उड्डाण करण्यापूर्वी प्रवाशांना सुरक्षितता समजावून सांगतात. कधीकधी विमान पायलटदेखील माईकद्वारे प्रवाशांना आवश्यक माहिती देत असतात. अशाच एका पायलटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पायलट अनोख्या आणि काव्यमय पद्धतीने अनाउन्समेंट करताना दिसतं आहे. या पायलटची अनाउन्समेंट प्रवाशांनाही खूप आवडल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.

हेही पाहा- केस कापायला गेला आणि खुर्चीत बसताच ‘तो’ ढसाढसा रडू लागला; व्हायरल Video पाहून हसू आवरणार नाही

मिळालेल्या माहितीनुसीर, स्पाइसजेट कंपनीचे विमान दिल्लीहून श्रीनगरला जात असताना पायलटने ही मजेदार अनाउन्समेंट केली आहे. पायलटची अनाउन्समेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा पायलट प्रवाशांना विमानात सिगारेट ओढू नका, तुमचा सन्मान राखण ही आमची जबाबदारी आहे, शिवाय आपलं विमान हवेत किती उंचीवरुन उडणार आहे. याबाबतची सर्व माहिती पायलट एका अनोख्या पद्धतीने देत आहे. शिवाय त्याने ही मोठी कविताच प्रवाशांसाठी लिहिली आहे, ती तुम्ही व्हिडीओत पाहू शकता.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून viralbhayani नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. तर ट्विटवरदेखील मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आत्तापर्यंत एक मिलियनहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर लाखो लोकांनी तो लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर मजेदार कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने ही अनाउन्समेंट ऐकल्यामुळे माझ्या दिवसाची सुंदर सुरुवात झाल्याचं म्हटलं आहे तर एका व्यक्तीने इंग्रजीपेक्षा भारतीय भाषांमध्ये अनाउन्समेंट चांगली करता येत असल्याचं म्हटलं आहे.