पावसाळ्यात जेव्हा वीज आकाशात कडाडत असतात तेव्हा आपल्या काळजाचं अक्षरश: पाणी पाणी होतं आणि ती वीज कोसळताना पाहिलं की मग हृदयाचा ठोकाच चुकतो. अशा परिस्थितीत कल्पना करा की, जर वीज अचानक तुमच्या अंगावर कोसळली तर? तर काय होईल हे सांगण अशक्य आहे. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. शिवाय हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मुसळधार पावसात कार बाहेर काढताना तुम्ही हजार वेळा विचार कराल यात शंका नाही. कारण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका कारवर अचानक वीज कोसळल्याचं दिसत आहे जे पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

कारवर वीज पडल्याने झाला अपघात –

Hyderabad woman in Jaguar attacks cop over wrong turn row video
जॅग्वार कार उलट्या बाजूनं चालवत पोलिसांवरच आरेरावी; शिवीगाळ करुन…संतापजनक VIDEO व्हायरल
Change your morning habits will help in achieving success
Morning Habits For Success: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बदला तुमच्या सकाळी उठल्यानंतरच्या या सवयी
Bhandara District Jail, Female Guard, Assaulted, Detainee, crime news,
धक्कादायक! कारागृहातील बंदीवानाचा महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!

सोशल मीडियावर अनेकवेळा असे व्हिडीओ आपल्या बघण्यात येतात जे पाहून आपल्या भिती वाटते कारण ते व्हिडीओ तेवढे भयानक असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका भरधाव कारवर अचानक वीज कोसळते, जे पाहून अनेकजण घाबरले आहेत. शिवाय व्हिडीओत भरधाव वेगाने येणाऱ्या कारच्या चारही बाजूंनी धूर निघताना दिसत आहे. जे पाहून मनात एकच प्रश्न येतो की, कारमध्ये बसलेल्या लोकांचे काय झाले असेल? मात्र, एवढा मोठा अपघात होऊनसुद्धा सुदैवाने कारमधील लोक सुखरुप बचावले आहेत.

हेही पाहा- चार वर्षाच्या चिमुरडीला बैलाने चिरडलं, हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचे CCTV फुटेज Viral

हेही पाहा- Video: आरतीच्या वेळी हनुमान मंदिरात अचानक शिरला साप; महिलेने सापाला हातात धरत केला भन्नाट डान्स

मदतीसाठी धावले लोक –

हा व्हिडिओ OddIy Terrifying नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘चालत्या कारवर वीज पडली आणि संपूर्ण शहर बचावासाठी धावले’. या संपूर्ण घटनेनंतर कारमध्ये बसलेल्या लोकांना वाचवण्यासाठी अनेक लोक धावत आल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, हा अपघात मोठा होता आणि त्याने भीषण रूप धारण केले असते, मात्र सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही, ही दिलासादायक बाब असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकजण तो शेअर आणि लाईक करत आहेत. शिवाय त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील नेटकरी देत आहेत.