Shocking video: कितीही म्हटलं तरी जगात रंग, रूप, राहणीमान या गोष्टींनाही महत्त्व देणारे खूप सापडतात. बरं, हे विचार ते फक्त मनात ठेवत नाहीत, तर बरेचदा उघडपणे बोलूनही दाखवतात आणि त्यावरून भेदभावही करतात. काळ्या रंगामुळे एखाद्याला हिणवणं, चिडवणं हे तर सामान्य झालं आहे. मात्र, सध्या समोर आलेली घटना धक्कादायक आहे. त्यामध्ये एका महिलेनं उबर ड्रायव्हरच्या डोळ्यांत चक्क मिरची स्प्रे मारला आहे. याचं कारण ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल. या तरुणीनं हा ड्रायव्हर काळा असल्यानं असं केल्याचा आरोप आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल. तरुणीने हद्दच पार केली अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एका तरुणीनं हद्दच पार केली आहे. या तरुणीनं उबर ड्रायव्हरच्या तोंडावर मिरचीचा स्प्रे मारला. कारण- तो काळा आहे. ही घटना न्यूयॉर्क पूर्व येथील लेक्सिंग्टन अव्हेन्यू येथील एका रस्त्यावर घडली. उबर ड्रायव्हरवर मिरपूड स्प्रेनं हल्ला करणाऱ्या महिलेनं द पोस्ट या वृत्तसंस्थेला सांगितलं की, उबर ड्रायव्हर काळा असल्यामुळे तिनं असं केलं. व्हिडीओमध्ये तरुणी जेनिफर गिलबॉल्ट आणि तिची एक मैत्रीण उबरच्या मागील सीटवर बसलेली दिसत आहे. यावेळी अचानक तरुणी गिलबॉल्टने ड्रायव्हरवर मिरचीचा स्प्रे मारला. यावेळी ड्रायव्हरनं याला प्रतिकार केला; पण तोपर्यंत हा मिरचीचा स्प्रे त्याच्या डोळ्यांत गेला होता. या सगळ्या झटापटीत ड्रायव्हर कसाबसा तिथून पळून जातो. यावेळी त्या तरुणीची मैत्रीण तिला ओरडत आहे की, हे तू काय करतेस? त्यावर जेनिफर म्हणाली की, मी हे सर्व करीत आहे. कारण- त्याचा रंग काळा आहे. या सगळ्या घटनेनंतर त्या दोषी तरुणीला अटक करण्यात आली. तिच्यावर थर्ड-डिग्री प्राणघातक हल्ला आणि गैरवर्तनाचा एक आरोप आहे. नेमकं काय घडलं? याबाबत ड्रायव्हर महमूद म्हणाला, "त्या दोघीही एकमेकींशी बोलत होत्या. मी त्यांच्याशी बोलतही नव्हतो. मी माझी गाडी चालवत होतो. यावेळी अचानक या तरुणीनं माझ्यावर मिरचीचा स्प्रे फवारला. माझे डोळे झोंबू लागले तेव्हा मी लगेच कार थांबवली आणि तिला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती आक्रमकपणे पुन्हा स्प्रे मारू लागली. मग मी तिथून पळून गेलो." पाहा व्हिडीओ हेही वाचा >> VIDEO: पुणे पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती! अल्पवयीन मुलाने अशी पळवली कार, महिला जागीच ठार; अंगावर शहारे आणणारा अपघात हा व्हिडीओ @BigYash_609 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे आणि अनेकांनी त्याला लाइक केले आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया युजर्स व्हिडीओवर अनेक प्रकारच्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले की, या मुलीची मानसिक स्थिती ठीक नाही. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि नंतर जेलमध्ये टाका. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, द्वेष कसा पसरत आहे.