सध्या गणेशोत्सव सुरू आहे. अनेकांच्या घरी गौरी -गणपतीचे उत्साहात स्वागत केले जात आहे. भाविकांनी त्यांचे मनोभावे सेवा केली आणि दुखी अंतकरणाने विसर्जनही केले. सोशल मीडियावर अनेक सुंदर गौरी -गणपतीचे व्हिडीओ पाहायला मिळत आहे. दरम्यान सध्या एक व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओ खऱ्याखुऱ्या गौरीं दिसत आहे. या गौरी इतक्या सुंदर दिसत आहेत, तुमची नजर हटणार नाही.

हा व्हिडीओ prajaktachavan999 यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल की, एखादी अभिनेत्री किंवा मॉडेलचे फोटोशूट असेल पण गौरीच्या रुपात दिसणाऱ्या तरुणी सर्व सामान्य मुली आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या मुली भाजी विकणाऱ्या जुळ्या बहिणी आहे. प्राजक्ता चव्हाण यांच्या इंस्टाग्राम अकाउंट पाहून समजते की, त्या एक मेकअप आर्टिस्ट आहेत. त्या सर्व सामान्य व्यक्तींचा मेकअप करुन त्यांचा मेकओव्हर करतात. त्यांच्या इंस्टाग्रामवर तुम्हाला अशाच प्रकारचे काही व्हिडीओ दिसतील. असाच मेकओव्हर त्यांनी या जुळ्या बहिणींचाही केला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

मेकअप करणे ही आजच्या काळात सामान्य गोष्ट आहे. मेकअपशिवाय प्रत्येक व्यक्ती सुंदरच दिसते पण मेकअप हा कोणत्याही व्यक्तीला आणखी सुंदर दिसण्यासाठी मदत करतो. पण मेकअप करून सुंदर दिसणे हे काही प्रत्येकाला परवडणारी गोष्ट नाही. काही लोक असे असतात जे रोज मेकअप करतात पण काही लोक जे कधीही मेकअप करत नाही. अशा लोकांनाही कधीतरी मेकअप करावा आणि सुंदर दिसावे असे वाटत असते. अशा लोकांचा मेकअप करुन त्यांना सुंदर दिसण्याची संधी प्राजक्ता यांनी दिली आहे.

हेही वाचा – खऱ्या आयुष्यात घडली ‘हम दिल दे चुके सनम’ची कथा, पतीने पत्नीचे प्रेमीबरोबर लावून दिले लग्न

हेही वाचा – कहरच केला राव! चक्क खूर्चीवर बसून रिक्षा चालवतोय हा माणूस; VIRAL फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल

सर्व सामान्य घरातील, कष्टकरी कुटुंबातील मुलींचा मेकओव्हर करुन त्यांना सुंदर गौराईचे स्वरुप दिले आहे. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. व्हिडीओवर लोकांच्या समिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काही लोकांना हा मेकओव्हर आवडला तर काहींनी मेकओव्हरच्या आधीच त्या मुली सुंदर दिसत होत्या.

Story img Loader