निसर्गातील प्रत्येक झाडाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. ही खास वैशिष्ट्ये त्या झाडांची शोभा वाढवतात. काही झाडे फळे, तर काही फुले, तर काही औषधी वनस्पतींचा पुरवठा करतात. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका जुन्या झाडाचे खास वैशिष्ट्य सांगण्यात आले आहे. काही वर्षांपासून या झाडाच्या खोडातून सतत पाणी वाहते आहे; जे बघून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून एका झाडातून चक्क पाणी येत आहे. मॉन्टेनेग्रोमधील (Montenegro) डिनोसा गावात एक झाड १५० वर्षांपूर्वीचे जुने झाड आहे. विशेष बाब म्हणजे १९९० च्या दशकापासून या झाडातून पाणी वाहते आहे. तसेच मुसळधार पाऊस पडला की, या झाडातून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू होतो. तसेच हे केवळ एक-दोन वर्षांपासून नाही, तर २० ते २५ वर्षांपासून घडते आहे, असे सांगण्यात येत आहे. बऱ्याच वर्षांपासून झाडातून पाणी येणाऱ्या या झाडाचा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा.
हेही वाचा…भरधाव वेगात आलेली रिक्षा अचानक हवेत उडाली; VIDEO पाहून सांगा नेमकं काय घडलं?
व्हिडीओ नक्की बघा :
१५० वर्षे जुन्या असणाऱ्या या झाडाच्या परिसरात अनेक भूमिगत झरे आहेत. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा हे झरे ओसंडून वाहतात. तसेच अतिरिक्त दाबामुळे हे पाणी झाडाच्या पोकळ खोडातूनही वाहू लागते. बऱ्याचदा दाब इतका जास्त असतो की, हे पाणी अतिशय वेगात झाडामधून येऊ लागते. तसेच हे २०-२५ वर्षांपासून घडते आहे. जमिनीपासून १.५ मीटर उंच असलेल्या या झाडाच्या खोडातून पाणी बाहेर पडू लागते. पण, ही नैसर्गिक गोष्ट आहे, असेसुद्धा सांगण्यात येत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gunsnrosesgirl3 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने या अनोख्या झाडाचा फोटो शेअर करीत या झाडाचे खास वैशिष्ट्य कॅप्शनमध्ये सांगितले आहे. तसेच अनेक नेटकरी या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया मांडताना दिसून आले आहेत. एकाने या झाडाला ‘मिनी कारंजे’ असे नाव ठेवले आहे. एका स्थानिक युजरने, २० वर्षांपूर्वी यातून पाणी बाहेर पडताना दिसत होते, तेव्हापासून ते सतत सुरू आहे, अशी कमेंट केली आहे आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.