Viral video: उन्हाळा आणि सुट्ट्यांमुळे अनेकांची रिसॉर्टस किंवा वॉटर पार्कमध्ये मौज करण्याला पसंती असते. पण हीच मजा मस्ती कधी कधी जीवावर पण बेतू शकते. एका रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलमध्ये पोहण्याआधी केलेली मस्ती तरुणाच्या चांगलीच अंगलट आली आहे. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हल्ली तरुण सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काहीही करु शकतात हे आपण मागे व्हायरल झालेल्या अनेक व्हिडीओमधून पाहिलं आहे. मात्र फेमस होण्याच्या नादात आपण आपला जीव धोक्यात घालतोय याचा तरुणाई अजिबत विचार करत नाही आणि अपघाताला बळी पडतात. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

हल्ली स्विंमिंग पूलमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, या गर्दीत एक धक्कादायक घटना घडत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण वॉटर पार्कमधल्या राईडमधून खाली येतो आणि थेट पूलमध्ये जातो. यावेळी तो राईडमधून जास्त वेगानं आल्यामुळे पाण्यात संपूर्ण खाली जातो. बराच वेळ वर न आल्यानं इतरांनी त्याला वर आणण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव होताना दिसला. तरुण गंभीर जखमी झाला असून त्याचा भयंकर अपघात झाला.

वॉटर पार्कला जाताना काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. कारण अपघात कधीही होऊ शकतो. यासाठी कुणी आधीपासून तयार नसतो. जेव्हा व्यक्तीला अपेक्षाही नसते तेव्हा विचारही केला नसेल, अशा घटना घडतात. वॉटरपार्कमध्ये आपण मज्जा मस्ती एन्जॉय करण्यासाठी जात असतो, पण हीच मजा कधीकधी आपल्या जीवावर बेतू शकते. आनंद लुटण्याच्या नादात अनेकांसोबत विचित्र घटना घडतानाही समोर येत आहे. त्यामुळे स्विमिंग पूलच्या पाण्यात मजा करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DJ0eGeNySuV/?utm_source=ig_web_copy_link

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उन्हाळ्यात आणि पावसाळ्या बहुतांश लोक पिकनीक काढतात. ते पावसात किंवा पाण्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतात. मौजमजेसाठी बरेचसे वॉटर पार्कमध्ये जातात. पूर्वीच्या काळी मोजक्याच वॉटर पार्क होत्या. पण आता असे अनेक वॉटरपार्क उघडण्यात आले आहे. ज्यांमध्ये स्विमिंगपुल शिवाय इतरही अनेक वॉटर स्लाईड्स असतात. तुम्हाला वॉटरपार्कमध्येही अनेक राइड्स मिळतील. काही खूप उंच आहेत, काही वक्र आहेत. काही मजेदार आहेत तर काही भीतीदायक आहेत. या राइड्सचा आनंद घेण्यासाठी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लोक रांगा लावतात. मात्र कधी-कधी या राइड्स अपघाताचे कारणही ठरतात. अशाच एका राइडमुळे भयंकर अपघात झालाय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ news_mp_09_21 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून यावर भरपूर कमेंट येत आहेत.