Wayand dog Viral video: केरळमधील वायनाड येथे मुसळधार पावसात भूस्खलन झाले. या भूस्खलनामुळे अनेक घरे, जीव ढिगार्याखाली गाडले गेले. अनेक लोकांचा मृत्यू झाला तर काही लोक जखमी आहे. या घटनेने सगळीकडे हाहाकार माजला आहे.या सगळ्यात वायनाडमधून समोर येणारा व्हिडीओ सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे. बऱ्याच लोकांना कुत्रे पाळायला आवडतात आणि ते त्यांना कुटुंबातील सदस्य मानतात. कुत्रे हे प्रामाणिकच नाही तर माणसाचं सर्वोत्तम मित्र असतात असं म्हटलं जातं. कुत्र्यांना बोलता येत नसलं, तरी ते माणसांत राहून आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे समजतात. आणि त्यांचं पालनही करतात. कुत्र्यांचे असेच अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होतातात, ज्यात कुत्रे मालकावर किती प्रमे करतात, त्यांचं प्रेम किती निस्वार्थ असतं हे वेळोवेळी सिद्ध होतं. मालकाबद्दल त्यांच्या मनात कधीही कटू भावना येत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ६ दिवसांनंतर आपल्या मालकाला भेटून कुत्र्याला किती आनंद झाला आहे पाहाच. ६ दिवसांनी मालक दिसल्यावर कुत्र्यानं काय केलं पाहा या व्हिडिओमध्ये एक कुत्रा त्याच्या मालकाला ६ दिवसांनी भेटताना दिसतो. हा कुत्रा एवढ्या दिवसांनंतर पहिल्यांदा मालकाला पाहतो तेव्हाचा क्षण पाहून तुम्हीही भावूक व्हाल. व्हायरल व्हिडिओमध्ये एक कुत्रा रस्त्यावर उभा असलेला दिसत आहे तो सगळीकडे पाहत आहे, जणू तो आपल्या मालकालाच शोधत आहे. तिथे एक महिलाही उभी आहे, जी कुत्र्याची मालकीण आहे.सुरुवातीला कुत्रा त्या व्यक्तीला ओळखत नाही, मात्र जेव्हा त्याला कळतं की हा आपला मालक आहे, त्यावेळी तो मालकाच्या अंगावर उड्या मारतो,त्याला मिठी मारतो. पाहा व्हिडीओ हेही वाचा >> VIDEO: आजी आणि नातीचा ‘तौबा तौबा’ गाण्यावर तुफान डान्स; एखाद्या हिरोईनलाही जमणार नाही अशा आजीच्या स्टेप या व्हिडिओला १९ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुत्रा आणि मालक यांच्यातील हे गोंडस नातेसंबंध तुमचं नक्कीच मन जिंकेल. एका युजरने लिहिले की, कुत्र्यांचे व्हिडिओ खूपच चांगले असतात आणि हा व्हिडिओ अप्रतिम आहे. दुसर्या युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, हा कुत्रा त्यांच्या मालकावर खूप प्रेम करतो. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये हजारो इमोजीही पाहायला मिळत आहेत.