जम्मू आणि पठाणकोट या जवळच्या शहरांमध्ये हवाई हल्ल्याच्या सूचनांमुळे गुरुवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल सामना मध्यावरच रद्द करण्यात आला, ज्यामुळे स्पर्धा सुरू राहण्याबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान येथील चिअरलिडरचा व्हिडीओ समोर आल्याने चिंतेचा वातार

पंजाब किंग्ज १०.१ षटकांत १ बाद १२२ धावांवर खेळत असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने सामना अचानक थांबला, सुरुवातीला फ्लडलाइट बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे मानले जात होते. पावसामुळे खेळ आधीच उशिरा सुरू झाला होता आणि पुन्हा सुरू झाल्यानंतर लगेचच संपूर्ण डोंगराळ शहर अंधारात बुडाले.

सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही संघांना आणि प्रेक्षकांना खबरदारीचा उपाय म्हणून स्टेडियममधून बाहेर काढण्यात आले. या परिस्थितीमध्ये, एका चिअरलीडरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये धर्मशाळा येथील वातावरण “खूपच भयावह” असल्याचे वर्णन केले आहे, ज्यामुळे चिंता निर्माण झाली आहे.

चिअरलिडरचा व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओमध्ये चिअरलिडर्स सांगते की, “सामानादरम्यान अचानक संपूर्ण स्टेडीयम रिकामे करण्यात आले. हे खूप भयावह होते. सर्वजण ओरडत होते. हे अजूनही भितीदायक आहे. आम्हाला धर्मशाळेतून बाहेर पडायचे आहे. IPLचे लोक आम्हाला मदत करतील अशा आशा आहे. मला अजूनही धक्का बसला आहे. व्हिडिओ सुरु असतानाच अचानक तेथील लाईट देखील बंद होतात.

सध्या खेळाडूंची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची

सीमापार तणावामुळे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मध्येच रद्द झाल्यानंतर खेळाडू आणि प्रेक्षकांना तातडीने मैदान रिकामे करण्यास सांगण्यात आले आणि आता भारतीय क्रिकेट बोर्डाने खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि प्रसारण पथकाला सुरक्षित क्षेत्रात पोहोचवण्यासाठी एक विशेष ट्रेनची योजना आखली आहे. “सर्वांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्यासाठी आम्ही धर्मशाळेपासून फार दूर नसलेल्या उना येथून एक विशेष ट्रेन आयोजित करत आहोत. सध्या सामना रद्द करण्यात आला आहे आणि स्टेडियम रिकामे करण्यात आले आहे. उद्याच्या परिस्थितीनुसार आम्ही स्पर्धेच्या भविष्याबद्दल निर्णय घेऊ. सध्या खेळाडूंची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे,” असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणतात.