Wedding bride dance video: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. दरम्यान अशाच एका नवरीने आपल्याच हळदीला भन्नाट डान्स केला आहे. म्हणतात ना, आयुष्य खूप सुंदर आहे पण ते आनंदाने जगता यायला पाहिजे. व्हायरल व्हिडीओ पाहून आनंदाने प्रत्येक क्षण कसा जगता येतो हे समजेल. नवरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या नवरीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल मला सुद्धा अशीच नवरी पाहिजे. लग्नाचे रितीरिवाज झाल्यावर नवरीने एक स्पेशल डान्स केला. लोक तिच्या कॉन्फिडन्सचं कौतुक करत आहेत.

आजकाल लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात काही मजेदार तर काही व्हिडीओ हैराण करणारे असतात. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये नवरीने स्वत:चीच हळद गाजवली आहे. नवरीने स्वत:च्याच हळदीला तुफान डान्स केलाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरी “हमको आज कल है इंतज़ार, कोई आये लेके प्यार, हमको आज कल है इंतज़ार कोई आये लेके प्यार” या माधुरी दिक्षीतच्या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहे. डान्स फ्लोअरवर उतरून नवरीने कमरेला साडीचा पदर बांधून डान्स केलाय. तेव्हा तिचं टॅलेंट पाहून अनेकांना तिचं कौतुक केलंय.

Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Delhi CM Atishi
Video : बिधुरींच्या आक्षेपार्ह विधानानंतर वडिलांबद्दल बोलताना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अश्रू अनावर; म्हणाल्या, “ते इतके आजारी असतात की…”
Girl dance on Hi Poli Saajuk Tupatali marathi song video viral on social media trending news
“ही पोळी साजुक तुपातली तिला म्हावर्‍याचा लागलाय नाद” तरुणीनं केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल घायाळ
Bride grand Welcome To The Chawla with Band
‘हा आनंद केवळ चाळीतच…’ नव्या सुनेचं असं स्वागत कधी पाहिलं नसेल; Viral Video पाहून आठवतील जुने दिवस
Ajit Pawar
Ajit Pawar : “तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…”, अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे” नवरा बायकोनं असा डान्स केला की सगळे नातेवाईक पाहतच राहिले

लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ feelings__0113 नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.सोशल मीडियावर व्हायरल झालेले विविध प्रकारचे डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये केवळ मुलंच नाही, तर विवाहित महिलाही स्वतःचं कौशल्य दाखवतात.

Story img Loader