Viral Video: लग्न आता फक्त हार घालणे, रिती रिवाज, गाणे, नाचणे आणि विधींपुरते मर्यादित राहिलेले नाही. ते आता जणू काही एखादं युद्धक्षेत्र बनलं आहे. अनेक ठिकाणी लग्नात नातेवाईकांचे रूसवेफुगवे असतातच. शिवाय बूटचोरीच्या नादात एकमेकांमध्ये वाद होतानाचे अने व्हिडीओ आपण पाहिले आहेत. अशाच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने लग्नाची व्याख्याच बदलून टाकली आहे. या व्हिडीओमध्ये वधू-वर नाही तर कुटुंबातील सदस्य आणि लग्नातील दोन्ही पक्ष एकमेकांवर फोमने हल्ला करत आहेत. काही वेळानंतर परिस्थिती इतकी हाताबाहेर जाते की लोक वधूकडे पाहून विचारू लागले की ही वधू आहे की एखाद्या हॉरर सिनेमातली भूत… व्हिडीओमध्ये लग्नाचे वातावरण हळूहळू मजामस्तीपासून ते एखाद्या आखाड्यात बदलताना दिसून येते. सर्वत्र पांढरा फेस उडताना दिसत आहे. लोक हसत आहेत आणि ओरडतही आहेत.

लग्नात दोन्ही पक्षांमध्ये फोम युद्ध

व्हिडीओमध्ये लग्नादरम्यान डीजेच्या तालावर लोक नाचताना स्पष्टपणे दिसत आहेत. अचानक हातात फोम स्प्रे घेऊन एकमेकांवर उडवताना दिसत आहेत. काही क्षणातच हे लग्नाचं ठिकाण एखाद्या आखाड्याचं रूप घेतं. वर आणि वधू पक्ष दोघांकडूनही वारंवार फोम फवारला जातो. त्यानंतर इथले वातावरण पूर्णपणे हाताबाहेर गेले दिसत आहे. या फोम युद्धात वधूची स्थिती स्रवात जास्त चर्चेत आहे.

व्हिडीओमध्ये वधू फोमने इतकी माखलेली दिसत आहे की ती वधू आहे हे ओळखणंही अवघड झालं. काही क्षणासाठी ती कोण आहे हेच ओळखता येणार नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मिडिया युजर्स आश्चर्य व्यक्त करत आहेत.

हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा वर्षाव झाला. काहींनी याला मजेदार आणि अनोख्या लग्न समारंभाचा भाग म्हटले तर काहींनी याला अतिउत्साह आणि निष्काळजीपणाचा कळस म्हणून टीका केली. system.paad.denge नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.