लग्नात डान्स करताना अचानक स्लॅब खचला अन्…; बघा Viral Video

हा मजेदार डान्स व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत २.८ मिलियन म्हणजेच २८ लाख वेळा पाहिला गेला आहे.

लग्नात डान्स करताना अचानक स्लॅब खचला अन्…; बघा Viral Video
लग्नातील 'धरती फाडू' डान्स एकदा बघाच ( photo : instagram/@ sumit_sks_._)

लग्न म्हटलं तर फक्त वधू-वरच नाही तर सर्व कुटुंब आनंदात असतं. लग्नात सर्व नातेवाईक एकत्र येत लग्नसमारंभाचा आनंद लुटतात. लग्नात लोक एकत्र येत जोरदार नाचतात. काही ठिकाणी तर वधू-वरही लग्नात नाचताना दिसतात. लग्नात डान्स नसेल तर लग्न अपूर्ण मानले जाते. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यामध्ये लोक लग्नसमारंभात मस्ती करताना आणि नाचताना दिसतात. आजकाल असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही कारण हा खूप मजेदार व्हिडीओ आहे.

तुम्ही पाहिलं असेल की वराचे मित्र अनेकदा म्हणतात की भाऊ तुझ्या लग्नात आम्ही जबरदस्त डान्स करू. या व्हायरल व्हिडीओ मध्ये असाच डान्स पाहायला मिळत आहे. जबरदस्त डान्स करून लोकांनी खरोखरच सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता की अनेक लोक डान्स करत आहेत, ज्यामध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. यादरम्यान, नाचताना अचानक स्लॅब खचतो आणि सर्वजण त्यासोबत खाली पडतात. लग्नसमारंभात लाकडी स्टेज तुटलेले तुम्ही पाहिलं असेल, पण घराच्या आतील स्लॅब तुटणे म्हणजे आश्चर्य आहे. तुम्ही खूप डान्स पाहिला असेल, पण असा नजारा तुम्ही यापूर्वी क्वचितच पाहिला असेल.

हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत २.८ मिलियन म्हणजेच २८ लाख वेळा पाहिला गेला आहे, तर २ लाख ८७ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Viral: आधी पुष्पहार कोण घालणार? यावरून वधू-वर भिडले; नेटीझन्स म्हणतात ‘हे लग्न आहे की रणांगण’
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी