Funny Wedding Gift Goes Viral: लग्नसमारंभात धमाल मस्ती ही असतेच. नातेवाईकांपासून ते मित्रांपर्यंत सर्वच जण लग्नात मजा करतात. एवढंच काय तर वधू-वरांचे मित्र-मैत्रीणदेखील सगळ्या गोष्टींची मजा घेत असतात. या संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्नाचा दिवस वधू-वरांसाठी खूप खास असतो. या दिवशी वधू आणि वराला भेटवस्तूदेखील दिल्या जातात. लग्नाच्या दिवशी दिलेल्या भेटवस्तू खूप महत्त्वाच्या आणि मौल्यवान असतात. या भेटवस्तू वधू-वरांच्या आयुष्यभर लक्षात राहतात. अशीच एक भेट वधू-वराला दिली गेली आहे. नेमकं कोणती भेट मिळाली जाणून घेऊया…

लग्न म्हटलं की हास्यविनोद, थट्टामस्करी आणि खास मित्रांची मजा ठरलेलीच असते. पण, काहीवेळा ही मजा इतकी टोकाची होते की नवरा-बायको दोघेही लाजून लालबुंद होतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका लग्नाचा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाला आहे, जिथे मित्रांनी दिलेलं गिफ्ट पाहून नवरीने लाजून चेहरा झाकला आणि नवऱ्यालाही हसू दाबता आलं नाही. नवरदेवाच्या मित्रांनी त्याला एक अनोखं गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत.

मित्रांनी केलं असं काही की दोघंही झाले लाजेने लाल

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतं की नवरा-नवरी मंचावर उभे आहेत आणि पाहुण्यांनी दिलेले भेटवस्तू स्वीकारत आहेत. तेवढ्यात नवरदेवाचे काही मित्र स्टेजवर येतात आणि त्या दोघांना एक गिफ्ट देतात. सुरुवातीला सगळं ठिकठाक वाटतं, पण जेव्हा गिफ्ट उघडलं जातं, तेव्हा उपस्थित पाहुणेमंडळी हसायला लागतात.

नवरीच्या हातात असते एक बाळाची दुधाची बाटली आणि नवर्‍याच्या हातात एक खुळखुळा एवढ्यावरच थांबायला नको, त्यांच्या दोघांच्या हातात एक मोठं पोस्टरही असतं, ज्यावर दोन लहान बाळांची छायाचित्रं आणि एक मजेशीर संदेश लिहिलेला असतो. त्यात लिहिलं असतं, “थांबा जरा…, नऊ महिन्यांमध्ये आम्हीपण येतोय!” हे बघून नवरीचा चेहरा लाजेने लाल होतो, ती हसत-हसत चेहरा झाकते आणि नवराही हसणं थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

नेटीझन्सना आवडलं ‘दोस्ती स्पेशल गिफ्ट’

हा धमाल व्हिडीओ @epic.insta.daily या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर लोकांनी या गिफ्टचं आणि त्या रिअ‍ॅक्शनचं तोंडभरून कौतुक केलं आहे. अनेकांनी कमेंट करत म्हटलं, “असले मित्र सगळ्यांच्या लग्नात हवेत”, तर दुसऱ्याने म्हटलं, “नवरीची रिअ‍ॅक्शन बघून पोट दुखेपर्यंत हसलो”, तर एकानं लिहिलं, “माझ्या लग्नातही असंच काही झालं होतं, हे क्षण कायम लक्षात राहतात!”, अशाप्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.