scorecardresearch

नवरदेवाला फसवायला गेलेल्या मेव्हणीने स्वत:चीच फजिती करुन घेतली, व्हायरल Video पाहून हसू आवरणार नाही

व्हिडीओत मेव्हणी एका प्लेटमधून रंगीत पाणी असलेले दोन-तीन ग्लास घेऊन स्टेजवर जाताना दिसत आहे

नवरदेवाला फसवायला गेलेल्या मेव्हणीने स्वत:चीच फजिती करुन घेतली, व्हायरल Video पाहून हसू आवरणार नाही
सोशल मीडियावर लग्न समारंभातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. (Photo : Instagram)

सोशल मीडियावर लग्न समारंभातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. शिवाय लग्न म्हटलं की नातेवाईक आणि मित्र एकमेकांची खूप चेष्टामस्करी करताना दिसतात. मात्र, याच चेष्टामस्करीत कधीकधी काही मनोरंजक घटना घडतात ज्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्नात नवरदेवाची मस्करी करण्यात आघाडीवर असते ती म्हणचे नवरदेवाची मेव्हणी. शिवाय मेव्हणी म्हटलं की तिला एक वेगळाच मान लग्नात असतो. त्यामुळे त्या हक्काने आपल्या दाजींसोबत मस्करी करत असतात.

सध्या अशाच एका मेव्हणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बहिणीच्या नवऱ्याची आणि आपल्या नवीन दाजीची मस्करी करायला गेलेल्या मेव्हणीचीच फजिती झाली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांना आपलं हसू आवरण कठीण होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्न समारंभ पार पडल्यानंतर नवरदेव स्टेजवर बसतो.

हेही पाहा- मालकिणीला घरकामात मदत करताना वानराची दमछाक, Viral Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

यादरम्यान नवरदेवाची मेव्हणी मस्करी करण्यासाठी स्टेजवर यते. यावेळी मेव्हणीने काहीतरी चर्चा करते जी ऐकून नवरदेवाला मेव्हणी त्याच्यासोबत काहीतरी मस्करी करणार असल्याची कल्पना येते. यावेळी नवरदेवासोबत त्याचा एक मित्रही स्टेजवर बसलेला दिसत आहे. मेव्हणी प्लेटमधून रंगीत पाणी असलेले दोन-तीन ग्लास घेऊन स्टेजवर जाते. वेगवेगळ्या रंगाते ग्लास पाहून नवरदेव आपली काहीतरी फसवणूक होणार असल्याच्या संशयामुळे ते पाणी पिण्यास नकार देतो. यावेळी नवरदेवाच्या शेजारी बसलेल्या त्याचा मित्र प्लेटमधील ग्लास घेण्याचा प्रयत्न करतो पण मेव्हणी त्याला तो ग्लास घेऊ देत नाही.

हेही वाचा- “आता वैताग आलाय…”, ‘सूर्यवंशम’ पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकाने थेट TV चॅनेललाच लिहिलं पत्र

मित्राने अनेकवेळा प्रयत्न करूनही मेव्हणीने ताटात ठेवलेले मिरचीचे पाणी नवरदेवाच्या मित्राला उचलू दिले नाही. मात्र, काही सेकंदातच असे काही घडतं की मेव्हणीची सर्वांसमोर फजिती होते. कारण एकमेकांशी बोलण्याच्या नादात अचनाक प्लेटमधील ग्लाससह मेव्हणी खुर्चीवरून खाली पडते यावेळी तिथे उपस्थित लोक तिला उचलण्याऐवजी हसत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ bridal_lehenga_designn नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 13:23 IST

संबंधित बातम्या