Viral Video: लग्न प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात खूप सुंदर आणि आयुष्य बदलणारा क्षण असतो, त्यामुळे या दिवशी वधू आणि वर त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतील अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. सुंदर कपडे, दागिने, मेकअप यासह डान्स, फोटोशूट अशा अनेक गोष्टींची आधीपासून तयारी केली जाते. आजपर्यंत अनेक लग्नांमधील काही हटके घटना आपण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या पाहिल्या असतील. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून सोशल मीडियावर लग्नातील हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक नवरी घोड्यावर बसून जबरदस्त डान्स करताना दिसतेय.

The man caught the waist of a woman
“बाई म्हणजे खेळणं वाटली का?”, त्याने बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या कंबरेला पकडलं अन्… VIDEO पाहून व्यक्त कराल संताप
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Brother Sister VIRAL Video
“कमाल भावा!” बहिणीला गाण्यात साथ देण्यासाठी स्टेजवर आला अन् असा गायला की…; पाहा सुंदर VIDEO
Girl dancing in Front of the crowd mother came and started beating her badly funny video
याला म्हणतात आईचा धाक! भर गर्दीत तरुणी कंबर हलवत करत होती डान्स; तेवढ्यात आई आली अन्…VIDEO पाहून पोट धरुन हसाल
tharla tar mag new promo trending
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीमने दिली आनंदाची बातमी! फक्त ८ तासांत केली ‘ही’ कामगिरी, जुई गडकरी म्हणाली…
The son-in-law refused the dowry Friendly Relationship Between Father In Law And Son In Law video
प्रत्येक मुलीच्या बापाला असा जावई मिळावा! भर मंडपात जावयाने काय केलं पाहा; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
leopard Milkman bike video
दुचाकीस्वार अन् बिबट्याची जोरदार धडक; रस्त्यात कोसळला अन् पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा, भयानक VIDEO व्हायरल
Gold price down gold silver price silver nagpur city rate
सुवर्णवार्ता… सोन्याच्या दरात नऊ तासात आपटी.. हे आहे आजचे दर…

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक नवरी लग्नात घोड्यावर बसली असून यावेळी गाण्याच्या तालावर नवरी जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. शिवाय यावेळी नवरीला ज्या घोड्यावर बसवण्यात आलं आहे त्या घोड्यालादेखील नाचवलं जात आहे. नवरीचा हा डान्स पाहून आजूबाजूला असलेले इतर लोकही तिला प्रोत्साहन देताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @samadhan_eshwar_bhosale या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘नक्कीच घोडेवाल्याची पोरगी असणार’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘नाद लागतो….कोणाचंपण काम नाय’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘नवरी शेतकऱ्याची कन्या असेल म्हणून घोड्यावर बसून डान्स करतेय’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘नवरीला मानलं आपण, एवढं सोप्प नाही हे. शेतकऱ्याची वाघीण दिसते.’

Story img Loader