Wedding Viral Video : हल्ली दिवाळीतच नाही तर वाढदिवस, लग्न अशा अनेक आनंदाच्या प्रसंगी हमखास फटाके फेडले जातात. पण, फटाके पेटवताना निष्काळजीपणा केला तर तो काहीवेळा जीवावरदेखील बेतू शकतो. सध्या अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात लग्नाच्या वरातीत फटाके फोडताना एका चुकीमुळे वराच्या लाखोंच्या गाडीची सर्वांच्या डोळ्यांदेखत राख रांगोळी झाली. ही घटना उत्तर प्रदेशातील सहरनपूरमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. पण, घटना कुठलीही असली तर तुम्ही वरातीत फटाके फोडताना अशी चूक करू नका हे सांगण्याचा प्रयत्न या बातमीच्या माध्यमातून केला जात आहे.
कारच्या सनरुफमध्ये उभे राहून फटाके फोडण्याचा घेत होते आनंद इतक्यात…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, रस्त्यावरून वराला घेऊन लग्नाची मिरवणूक जात आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली जात आहे. यादरम्यान अनेक वाहने व लोक तेथून ये-जा करताना दिसत आहेत. यावेळी काही तरुण वरासाठी सजवलेल्या कारच्या सनरुफमध्ये उभे राहून फटाके फोडण्याचा आनंद घेत आहेत. पण असे करताना अचानक तरुणाच्या हातातील फटाका कारच्या आत जाऊन फुटला, ज्यामुळे कारने पेट घेतला. यात संपूर्ण कार जळून खाक झाली.
व्हिडीओमध्ये दोन तरुण कारमध्ये उभे राहून चक्क हातात फटाके घेऊन फोडत असल्याचे दिसत आहे. एक तरुण कारच्या सनरुफमधून, तर दुसरा कारच्या खिडकीवर उभं राहून हातात पेटता फटाका घेऊन उभा आहे, याचवेळी सनरुफमध्ये उभ्या असलेल्या तरुणाच्या हातातील फटाक्याने मोठा पेट घेतला, त्यामुळे तरुणाने फटाका हातातून सोडून दिला. हाच फटाका नंतर कारच्या सीटवर पडून फुटू लागला, ज्यामुळे कारने पेट घेतला.
VIDEO : वेळेपुढे सगळेच झुकतात! थकलेलं शरीर, संथ चाल अन्…; सिंहाची अशी अवस्था पाहून लोक थक्क
या घटनेवेळी चालकाने लगेचच कारमधून उडी मारून आपला जीव वाचवला. पण, यात महागडी कार जळून खाक झाली. कारला आग लागल्यानंतर लोक काहीच करू शकले नाहीत. लोकांच्या डोळ्यासमोर कारला आग लागली आणि कार जळून खाक झाली, पण कोणीही काही करू शकले नाही. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओवर लोकांच्या कमेंट्स
हा निष्काळजीपणा असून पोलिसांनी यावर कारवाई करावी, अशी मागणी अनेक युजर्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, फटाके फोडण्याबाबत नियम आणि कायदे करण्याची वेळ आली आहे, अन्यथा असे लोक स्वत:सह निरपराध लोकांचाही जीव घेतील.