scorecardresearch

Premium

अरेच्चा ! गोविंदा आणि करीश्मा कपूरलाही टाकले मागे, नवरदेव नवरीचा भन्नाट डान्स पाहून तुम्हीही व्हाल फॅन

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरदेव नवरी खुद्दार या चित्रपटातील गोविंदा आणि करीश्मा कपूच्या गाण्यावर डान्स करत आहे.

desi couple dance on Govinda Karishma song
(photo : Twitter)

Viral Video : लग्न म्हणजे दोन व्यक्तीच्या आयुष्याचा शुभारंभ असतो. अशाच एका वधू-वराच्या जोडप्याने त्यांचा लग्नाचा दिवस आणखी विस्मरणीय केला आहे. या नवरदेव नवरीने स्टेजवर नव्वदच्या दशकातील एका गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. हा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

लग्नातील डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल असतात पण नवरा-नवरीचा हा डान्स व्हिडीओ खूप हटके आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरदेव नवरी खुद्दार या चित्रपटातील गोविंदा आणि करीश्मा कपूच्या गाण्यावर डान्स करत आहे. एवढंच काय तर गाण्यावरील स्टेप्ससुद्धा मॅचिंग करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त
marathi women denied flat in mulund west viral video
“महाराष्ट्रीयन अलाऊड नाही” म्हणणाऱ्या बाप-लेकानं मराठी महिलेची मागितली माफी; नेमकं घडलं काय होतं? पाहा Video!

हेही वाचा : OMG! चक्क कुत्रा ओढतोय सिगारेट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

वरदेव नवरीचा भन्नाट डान्स

नवरदेव नवरीचा हा भन्नाट डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी त्यांच्या डान्सवर फिदा झाले असून वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. एका यूजर ने लिहिले, ” खूप छान” दुसरा यूजर लिहितो, “रब ने बना दी जोड़ी” तर अन्य एक यूजर लिहितो की, “या डान्स स्टेप्सची रिहर्सल कमीत कमी दहा दिवस केली असणार”

हेही वाचा : आईचं प्रेम पाहून व्हाल भावुक! बससाठी पैसे नसताना मुलीला भेटायला ‘अशी’ गेली दिव्यांग महिला; १७० किमी केला एकटीने प्रवास

@ipskabra या ट्वीटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘ही जोडी खरोखर Made for each other आहे’ असे लिहिले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wedding viral video of bride groom danced on govinda karishma song desi couple become famous on social media ndj

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×