सोशल मीडियावर अनेकदा लाखो व्हिडीओज रोज पोस्ट होतात. फेसबूक, इंस्टाग्राम आणि युट्यूब सारख्या फ्लॅटफॉर्मचा वापर करून लोक स्वत:चे किंवा इतरांचे कौशल्य सादर करतात. अनेकदा आपल्या कौशल्यामुळे काही लोक रातो-रात व्हायरल होता. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेच विषय ठरत आहे ज्यामध्ये एका लिंबू पाणी विक्रेता आपले आगळे-वेगळे कौशल्य वापरताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओनुसार, एक व्यक्ती अनेक पक्षांचे आवाज काढून लिंबू सरबत विकत आहे. त्याच वेळी, तो ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या अनोख्या प्रतिभेचा वापर करताना दिसत आहे.
घर चालवण्यासाठी माणसाला काय काय करावं लागतं, याचं जिवंत उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका लिंबू सरबत विक्रेत्याने आपल्या कलेचा अनोखा वापर करत, वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढून ग्राहकांना आकर्षित करण्याची भन्नाट पद्धत शोधली आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याच्या संघर्षाला सलाम केला आहे. तो वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज इतक्या स्पष्टतेने आणि अचूकतेने काढतो की ते पाहून कोणीही थक्क होईल. त्या व्यक्तीची ही प्रतिभा पाहून लोक आश्चर्यचकित झाले. अनेकांनी तो व्हिडिओ रेकॉर्ड करायलाही सुरुवात केली.
हा व्हिडिओ TechSupport786903 या हँडलवर यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक युझर्सनी या व्हिडिओवर कमेंट्सही केल्या आहेत. एका युझरने लिहिले की, ग्राहकांना व्यवसायासाठी कसे आकर्षित केले जात आहे? दुसऱ्या एकाने लिहिले, “कधी कधी रिल्सवर अशी कला पाहायला मिळते” त्याच वेळी, आणखी एका युझरने लिहिले, ” एका पुरुषाच्या आयुष्यात किती संघर्ष असतो, घर चालवण्यासाठी काय काय करावे लागते.
