kulhad pizza couple viral video: आतापर्यंत तुम्ही मातीच्या भांड्यात तयार केलेला ‘कुल्हड चहा’ ऐकला असेल पण ‘कुल्हड पिझ्झा’ कधी ऐकलाय का? गुजरातच्या सुरतमधील एका दुकानात विकला जाणारा हा ‘कुल्हड पिझ्झा’ वर्षभरापूर्वी बरीच चर्चा झाली. परंतु आता त्यांचा एक कथित व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावरुन हे जोडपं पुन्हा चर्चेत आलंय. हे प्रकरण इतकं गंभीर बनलंय की ते पोलिसांपर्यंत पोहोचलंय. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कुल्हड पिझ्झा कपलचा एक खाजगी व्हिडीओ व्हायरल झालाय. हा खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या जोडप्याला ट्रोल करण्यात आलंय. कुल्हड पिझ्झा कपल सहज अरोरा आणि गुरप्रीत कौर यांचा खासगी व्हिडीओ कुणीतरी इंटरनेटवर शेअर केला. काही वेळातच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. दरम्यान, यावर नेटकऱ्यांनी अश्लिल कमेंट्सही केल्याचे प्रकार घडले. दोघांनीही या प्रकरणानंतर एक व्हिडीओ जारी करून स्पष्टीकरण दिलंय. सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण या वादावर आता सेहज अरोराने भाष्य केलं असून, स्पष्टीकरण देणारा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने व्हायरल झालेला व्हिडीओ खोटा असून, AI च्या मदतीने तयार करण्यात आल्याचा दावा केला आहे. सेहज अरोराने पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा राहून रेकॉर्ड केला आहे. पाहा व्हिडीओ हेही वाचा >> सुट्टे नाहीत? मग Gpay करा; आता भिकारीही झाले डिजिटल, मुलीचा जुगाड तुफान व्हायरल दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. पण अद्याप याप्रकरणी अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही.