राकेश झुनझुनवालांच्या २९ हजार ७०० कोटींच्या शेअर्सचं काय होणार?

‘फोर्ब्स’च्या २०२१ सालच्या सूचीनुसार भारतातील ३६ व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत अब्जाधीश होते.

राकेश झुनझुनवालांच्या २९ हजार ७०० कोटींच्या शेअर्सचं काय होणार?
फोर्ब्सच्या यादीनुसार झुनझुनवालांची एकूण संपत्ती ४६,००० कोटी इतकी आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत आणि मुरब्बी गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी सकाळी निधन झाले. ६२ व्या वर्षी राकेश झुनझुनवाला यांचं निधन झाल्याची बातमी सकाळीच प्रसारमाध्यमांवर झळकली आणि अनेकांना धक्का बसला. भांडवली बाजारातील गुंतवणुकीतून चांगला पैसा कमावता येतो आणि तो टिकवताही येतो, याचा वस्तुपाठ घालून देणारे झुनझुनवाला हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ३६ व्या स्थानी होते. फोर्ब्सच्या यादीनुसार झुनझुनवालांची एकूण संपत्ती ४६,००० कोटी इतकी आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण: ‘२०४७ पर्यंत अखंड भारत’ हे RSS चं लक्ष्य पण ‘अखंड भारत’ म्हणजे काय? त्यातून कोणते प्रांत देश म्हणून अस्तित्वात आले?

गुंतवणुकीतून संपत्ती निर्मितीचे झुनझुनवाला यांचे कर्तृत्व, सामान्य गुंतवणूकदारांमध्ये त्यांच्याबद्दल वलय आणि आदर निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. त्यांच्या गुंतवणुकीचा परिसस्पर्श झालेल्या अशा कंपन्यांमध्ये चढाओढीने गुंतवणूक केली जाण्याची प्रथाच निर्माण झाली होती. पाच हजार रुपयांच्या भांडवलासह सुरुवात करीत, सुमारे ४६,००० कोटी रुपयांच्या संपत्तीसह झुनझुनवाला यांनी ‘फोर्ब्स’च्या २०२१ सालच्या सूचीनुसार भारतातील ३६ व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत अब्जाधीश म्हणून स्थान कमावण्यापर्यंत मजल मारली. त्यामुळेच झुनझुनवाला यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची बातमी समोर आल्यानंतर सर्वाधिक चर्चेत असणारा विषय म्हणजे त्यांच्या मालकीच्या शेअर्सचं काय होणार?

नक्की वाचा >> विश्लेषण : लोकांनी बँकांमधून पैसे काढू नयेत म्हणून चिनी सरकारने बँकांबाहेर तैनात केले रणगाडे? चीनमध्ये नेमकं चाललंय तरी काय?

सिडनहॅम महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असतानाच १९८५ मध्ये त्यांनी नातेवाईकाकडून कर्ज घेऊन भांडवली बाजारात पहिली गुंतवणूक केली. त्यावेळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १५० वर होता. या गुंतवणुकीनंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. १२ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार झुनझुनवाला यांच्या मालकीचे २९ हजार ७०० कोटींचे शेअर्स शेअर बाजारामध्ये आहेत.

नक्की वाचा >> विश्लेषण : राऊतांच्या घरात साडेअकरा लाख तर अर्पिताच्या घरात सापडले ५० कोटी; कायद्यानुसार घरात किती रोख रक्कम आणि सोनं ठेवता येतं?

नियमांनुसार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जवळच्या नातेवाईकांना मृत्यूचा दाखला सादर करुन संबंधित शेअर्स आपल्या नावावरुन करता येतात. मात्र हा मृत्यूचा दाखल नोटरी किंवा गॅझेटेड अधिकाऱ्यांकडून साक्षांकित केलेला असणं आवश्यक आहे. मात्र असा अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं नाव हे मरण पावलेल्या व्यक्तीचा वारस म्हणून एएसडीएल किंवा सीएलडीएसकडे नोंदणी केलेलं असावं, अशी अट आहे. मात्र वारस म्हणून नोंदणी नसलेल्या व्यक्तींना शेअर्स नावावर करुन घ्यायचे असतील तर त्यांना खालील तीन गोष्टींपैकी एक गोष्ट सादर करावी लागते…

> मृत्यूपत्र खरं असल्याचा न्यायालयाचा दाखला
> उत्तराधिकार प्रमाणपत्र
> प्रशासनाची पत्रे

शेअर्सच्या वारसांसंदर्भात झी मिडियाशी चौहान अ‍ॅण्ड लाथ कंपनीचे भागीदार असणाऱ्या धर्मेंद्र चौहान यांनी, “वारस हा विश्वस्त असतो मालक नाही. जर मृत्यूपत्र उपलब्ध असेल तर त्यानुसार शेअर्सची मालकी निश्चित केली जाते. मृत्यूपत्र नसेल आणि कोणी दावा केला नाही तर नियमानुसार हिंदू वारस कायद्यानुसार मरण पावलेल्या व्यक्तीच्या वारसांमध्ये शेअर्सचं समान वाटप होतं.”

नक्की वाचा >> विश्लेषण : चीन आणि तैवानचं युद्ध झाल्यास भारताला बसणार मोठा फटका; स्मार्टफोन, टीव्ही, फ्रिज, एसी महागणार

इकनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार झुनझुनवाल यांनी फार वर्षांपूर्वीच आपल्या शेअर्सच्या वारसा हक्कासंदर्भातील कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत. याच विषयाशी संबंधित एका व्यक्तीने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, झुनझुनवाला यांनी आपल्या लिस्टेड आणि अनलिस्टेड कंपन्यांची मालकी तसेच स्थावर मालमत्ता पत्नी रेखा आणि तीन मुलांच्या नावे केली आहे. तसेच आपल्या संपत्तीसंदर्भातील निर्णय हे कंपनीचा कारभार संभाळणारे प्रोफेश्नल आणि कुटुंबीय घेतील असंही झुनझुनवाला यांनी या कागदपत्रांमध्ये स्पष्ट केलं आहे. झुनझुनवाला यांनी गेल्या वर्षभरात त्याच्या बहुतेक गुंतवणूकदार कंपन्यांमधून प्रकृतीसंदर्भातील कारणांमुळे तसेच अन्य खासगी कारणांमुळे जबाबदाऱ्यारी असणाऱ्या पदांचा त्याग केला होता. यामध्ये प्रमुख्याने कंपन्यांमधील बोर्डामध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या पदांचा त्यांनी त्याग करत होता, अशी माहिती सुद्धा या व्यक्तीने दिली.

‘रारे एंटरप्रायझेस’ नावाने बऱ्याच वर्षांपूर्वी झुनझुनवाला यांनी गुंतवणूक संस्था सुरु केली होती. या संस्थेचं नाव त्यांच्या आणि पत्नी रेखा यांच्या नावांतील आद्याक्षरांवरून ठेवलं आहे. या कंपनीचा पुढील कारभार सध्याची व्यवस्थापकीय तुकडीच करणार आहे. या तुकडीचं नेतृत्व उत्पल सेठ आणि अमित गोयल करत आहेत.

नक्की वाचा >> विश्लेषण: बिष्णोई गँगकडून सलमानला काळवीट शिकारीवरुन धमकी; पण बिष्णोई समाजासाठी काळवीट एवढं महत्वाचं का?

“त्यांच्या स्वभावानुसार आणि लहान लहान गोष्टींची दखल घेण्याच्या सवयीप्रमाणे त्यांनी त्यांचा वारसा अगदी सहजपणे दुसऱ्याकडे हस्तांतरित करण्यासंदर्भातील नियोजन आधीच करुन ठेवलेलं आहे,” असं ‘रारे एंटरप्रायझेस’ने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

जे सागर असोसिएट्स या कायदेविषयक संस्थेमधील माजी व्यवस्थापकीय अधिकारी असणाऱ्या ब्रिजेस देसाई यांनीच झुनझुनवालांच्या वासरासंदर्भातील कागदपत्रांचं काम पाहिलं होतं. फार पूर्वीच त्यांनी या साऱ्याचं नियोजन केलं होतं असं देसाई यांनी सांगितलं. १२ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार झुनझुनवालांकडील सर्व शेअर्सची किंमत २९ हजार ७०० इतकी आहे. यापैकी सर्वाधिक शेअर्स हे टायटन कंपनीचे आहेत.

ब्लुमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार टायटन कंपनीमधील झुनझुनवाला यांची गुंतवणूक ही सर्वात यशस्वी गुंतवणुकीपैकी आहे. झुनझुनवाला दांपत्याच्या शेअर्समधील एकूण गुंतवणुकीपैकी एक तृतीयांश गुंतवणूक या कंपनीत आहे. याचप्रमाणे स्टार हेल्थ अ‍ॅण्ड अलाइड इन्शूरन्स कंपनी, फूटवेअर क्षेत्रातील मेट्रो ब्रॅण्ड लिमिटेड, टाटा मोटर्स लमिटेड या कंपन्यांमध्येही झुनझुनवाला यांची मोठी गुंतवणूक आहे. झुनझुनवाला यांची स्टार हेल्थमध्ये १० टक्क्यांहून अधिक गुंतवणूक आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
एक ‘जादू की झप्पी’ ठरली डोक्याला ताप; तीन बरगड्या मोडल्या, दीड लाखाचा दंड भरला, वाचा सविस्तर
फोटो गॅलरी