Dry Ice Effect on Human Body : गुरुग्राम येथील रेस्टॉरंटमध्ये घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री गुरुग्रामधील एका रेस्टॉरंटमध्ये माऊथ फ्रेशनर समजून ड्राय आईस खाल्ल्यानंतर पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. “एका वेटरने त्यांना ड्राय आईस दिला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अंकित, नेहा सबरवाल, मनिका गोयंका, प्रितिका रुस्तगी, दीपक अरोडा आणि हिमानी हे सर्वजण सेक्टर ९० मधील लाफोरेस्टा कॅफेमध्ये रात्री ९.३० च्या सुमारास जेवणासाठी गेले होते. दरम्यान, जेवल्यानंतर एका वेटरने त्यांना माऊथ फ्रेशनर ऑफर केले. ते सेवन केल्यावर, त्यांच्या तोंडाची आग होऊ लागली. त्यानंतर रक्तस्त्राव सुरु झाला. त्यांनी रक्ताची उटली केली.” असे अंकित यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवताना सांगितले

अंकितने असेही सांगितले की, “मी माझी एक वर्षाची मुलगी दुर्वाक्षी हिला उचलून घेतले होते त्यामुळे मी ते माउथ फ्रेशनरचे सेवन केले नाही. माऊथ फ्रेशनर म्हणून आम्हाला जे काही दिले त्याबद्दल आम्ही चौकशी केली असता वेटरने आम्हाला एक ड्राय आईसचे पॉलिथिन पॅकेट दाखवले, जे मी ताब्यात घेतले.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यानंतर अंकितने पोलिसांना बोलावले आणि त्याच्या मित्रांना सेक्टर ९० मधील आर्वी हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. अंकितने दावा केला की,”डॉक्टरांनी त्याने घेतलेला ‘माउथ फ्रेशनर’ नमुना तपासला आणि तो ड्राय आईस असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी आम्हाला ड्राय आईस हॉस्पिटलकडे सोपवण्याचा सल्ला दिला कारण ते प्राणघातक असू शकते. अंकितने पोलिसांना रेस्टॉरंटच्या विरोधात तक्रार नोंदवण्याची विनंती केली.

माऊथ फ्रेशर म्हणून ड्राय आईस देणाऱ्या वेटरविरोधात खेरकी दौला पोलिस ठाण्यात अमित यांनी एफआयआर नोंदवली आहे. विष देऊन दुखापत करणे आणि गुन्हेगारी कट रचणे या आयपीसी कलमांतर्गत एफआयआर नोंदवली आहे. एफआयआरनुसार डॉक्टरांनी सांगितले की,”रुग्णांना रासायनिक बर्न्स पॉयझनिंग (burns poisoning) झाले आहे. नक्की हा पदार्थ कोणते आहे हे तपासण्यासाठी नमुना एफएसएलकडे (FSL) पाठवला आहे. “

हेही वाचा – सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली आणि मुलगी साराबरोबर घेतला शिकारा राईडचा आनंद, व्हिडीओ केला शेअर

दरम्यान या घटनेनंतर तीन जणांना अद्याप रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, परंतु त्यांची प्रकृती चांगली आहे,” असे पोलिसांनी सांगितले.

रेस्टॉरंटचे व्यवस्थापक गगन यांनी सांगितले की, “कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. रात्रीच्या जेवणानंतर ही घटना घडली आणि कर्मचाऱ्यांनी ड्राय आईस बाहेर टाकून दिला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करत आहेत आणि त्यांनी या ड्राय आईसचे नमुने घेतले आहेत.”

हेही वाचा – कर्तव्य प्रथम! एवढ्या बर्फातही आरोग्य सेविका १५ किलोमीटर चालत जाते; VIDEO पाहून कराल सलाम

ड्राय आईस म्हणजे काय?

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI), युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन तसेच रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (CDC) नुसार, “ड्राय आईस हा एक प्राणघातक पदार्थ आहे. त्याला कधीही थेट स्पर्श केला जाऊ नये. ड्राय आईसला स्पर्श केल्यास किंवा सेवन केल्यास ते ‘त्वचा आणि अंतर्गत अवयवांना गंभीर नुकसान होऊ शकते”

११ ऑक्टोबर २०२९ रोजीच्या एका अहवालातमध्ये, FSSAI ने सांगितले आहे की,”ड्राय आईस हा (पाण्याच्या बर्फाप्रमाणेच) घन कार्बन डायऑक्साइड असतो. ड्राय आईस सामान्यतः आइस्क्रीम, फ्रोझन डेझर्ट इत्यादी खाद्यपदार्थांना थंड ठेवण्यासाठी वापरले जातो. पण जर ते योग्यरित्या हाताळले नाही तर ते मानवी आरोग्य धोक्यात टाकू शकतो, कारण तो कार्बन डायऑक्साइड वायूमध्ये मोठ्या प्रमाणात उत्तेजित होतो ज्यामुळे श्वासोच्छवासाचा धोका (हायपरकॅपनिया) होऊ शकतो. या कारणास्तव, ते हवेशीर वातावरणात मोकळ्या हवेत वापरले पाहिजे/उघडले पाहिजे.

FDAच्या अहवालानुसार, “पदार्थ थंड ठेवण्यासाठी उपकरणे उपलब्ध नसलेल्या परिस्थितीत गोठवलेल्या पदार्थांचे संरक्षण करण्यासाठी ड्राय आईस वापर केला जातो.”

०१ जुलै २०२१ रोजीच्या नोटमध्ये रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (CDC) चेतावणी दिली की,

कर्मचाऱ्यांना पदार्थाच्या दुष्परिणामांबद्दल सतत सूचना देऊन सावध केले पाहिजे.

कर्मचाऱ्यांनी ड्राय आईसला स्पर्श करू नये किंवा त्याचे सेवन करू नये.

ड्राय आईसला थेट मोकळ्या हातांनी कधीही हाताळू नये.

नेहमी अतिशय थंड तापमानासाठी डिझाइन केलेले हातमोजे आणि सुरक्षितता देणारे गॉगल वापरावे.

नेहमी हवेशीर खोलीत काम करा.

ड्राय आईस खाऊ नका.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is dry ice 5 diners at gurgaon eatery hospitalised after mistakenly being served dry ice as mouth freshener snk
First published on: 05-03-2024 at 09:39 IST