Viral Video : सध्या सगळीकडे गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. बाप्पााच्या आगमनापासून तर बाप्पााच्या विसर्जनापर्यंत एकच आवाज सगळीकडे ऐकू येत आहे, तो म्हणजे ढोल ताशाचा. दरवर्षी तरुण मंडळी ढोल ताशा वादनासाठी आतुरतेने वाट पाहतात. तब्बल दहा दिवस ही तरुण मंडळी ढोल वादन करतात.
पुणे शहरात तर ढोल पथकांचा एक आगळा वेगळा इतिहास आहे.पुण्यात १५० हून अधिक ढोल पथके ही नोंदणीकृत आहे. गणेशोत्सवापूर्वी ते ढोल ताशाची तालीम करतात आणि गणेशोत्सवादरम्यान ढोल ताशा वाजवतात. सोशल मीडियावर पुण्यातील अनेक ढोल ताशा पथकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक ढोल पथके अत्यंत सुरेख ढोल ताशा वाजवतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण मंडळी ढोल ताशा वाजवताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की सर्व जण ढोल ताशा वाजवण्यात मग्न आहे. ढोल ताशा वाजवणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा मिळेल.
व्हिडीओवर कॅप्शनमध्ये प्रश्न विचारलाय, “ढोल ताशा म्हणजे नेमकं काय?” कदाचित तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ढोल ताशाची व्याख्या कशी मांडायची? पुढे तुम्हाला व्हिडीओवर ढोला ताशा म्हणजे नेमकं काय सांगितलेय. व्हिडीओवर लिहिलेय, “संस्कृतीची ओळख, अभिमानाचं प्रतीक, ऊर्जेची स्पंदनं, देवाच्या दरवाजातला आर्त ध्वनी”
पाहा व्हायरल व्हिडीओ
xplorepunecity या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ढोल पथक – परंपरेचा ध्यास, संस्कृतीची आठवण!तालात लयबद्ध होऊन आपली समृद्ध वारसा जपणारा आवाज!” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ढोल ताशा म्हणजे पुणे” काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
महाराष्ट्रातील पहिले तृतीयपंथी ढोल-ताशा पथक
पुण्यात जवळपास २०० हून अधिक ढोल-ताशा पथकं आहेत ,ज्यामध्ये अनेक तरुण-तरुणी सहभागी होतात. पण, आता या ढोल-ताशा यंदा तृतीयपंथींच्या ढोल-ताशा पथकाचा समावेश झाला आहे. हे फक्त पुण्यातील नव्हे तर भारतातील पहिले ढोल-ताशा पथक ठरले आहे. राज्यातील पहिल्या तृतीयपंथी ढोल-ताशा पथकाचे नाव शिखंडी असे ठेवण्यात आलं आहे. महाभारतातील एका योद्ध्याच्या नावावरून ‘शिखंडी’ असे नाव देण्यात आले. यंदा पहिल्यांदाच या तृतीयपंथी ढोल-ताशा पथकाने पुण्यातील गणेशोत्सवामध्ये वादन सादर केले. त्यांचे सुद्धा व्हिडीओ सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.