आयुष्याच्या मार्गदर्शनात आईचे स्थान अमूल्य असते. ज्या काळात आपण जगाच्या रंगमंचावर पदार्पण करतो, त्या काळात आई आपल्या जीवनातील पहिली शिक्षक असते. तिच्या शिकवणींमुळेच आपल्याला योग्य दिशा सापडते. आईची शिकवण म्हणजे केवळ शिक्षण किंवा ज्ञानाची बाब नाही, तर ती जीवनाचे मूल्य, नैतिकता, आदर्श, आणि सहानुभूती यांचाही समावेश करते. आईची शिकवण म्हणजे आयुष्यभराची शिदोरी असते, यावरच आधारीत एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये किर्तनकार महाराजांनी आईची शिकवण कशी आयुष्यात उपयोगी ठरते याचं उदाहरण दिलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल आईचं महत्त्व.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महाराज सांगत आहेत की, एक आई मुलाला म्हणतेय तू इंजिनियर झाला आहेस ना, महिना झाला घरातला नळ लिकेज आहे.पकड घे आणि तो नळ आधी दुरुस्त कर. यावर मुलगा नळ दुरुस्त करतो आणि आईला सांगतो बघ मी नळ दुरुस्त केला. त्यानंतर काही दिवसांनी त्याचा नोकरीसाठी इंटरव्ह्यू असतो. तो इंटरव्ह्यूला जातो मात्र याठिकाणी १०० उमेदवार आणि नोकरी एकच अशी परिस्थिती असते. एक एक करुन सगळे उमेदवार इंटरव्ह्यू देऊन येतात, यानंतर या तरुणाची वेळ येते. हा तरुण इंटरव्ह्यूला आतमध्ये जातो आणि समोर त्याला एक नळ सुरु असलेला दिसतो, तो नळ तरुण आधी बंद करतो मग इंटरव्ह्यूसाठी पुढे जातो. हे पाहून परीक्षक खूश होतात आणि तुझी नोकरी पक्की असं त्याला सांगतात. यावर तो गोंधळतो आणि विचारतो हे कसं? त्यावर परीक्षक उत्तर देतात की ९९ तरुण आले, गेले मात्र नळ बंद कुणीच केला नाही पण तू केलास. यावेळी या तरुणाच्या डोळ्यात पाणी येते आणि आईने दिलेल्या शिकवणीची त्याला आठवण होते. यानंतर तो त्याच्या डायरीमध्ये लिहतो, “घडाळ्याची टिक टिक टाईम मॅनेजमेंट शिकवते तर आईची कट कट लाइफ मॅनेजमेंट शिकवते.”

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Brother sister emotional video bride remembered his father at the wedding and crying emotional video goes viral
VIDEO:”जेव्हा वडिलांची जागा भाऊ घेतो” अंगाला हळद लागली पण बघायला बाप नाही, वडिलांचा फोटो घेऊन भावानं काय केलं पाहा
Aai kuthe kay karte fame Sumant Thakre shared emotional post after serial off air
“हे थोडं अस्वस्थ करणारं…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाला, “मधुराणीने साकारलेली आई…”
Heartwarming Video
“सासू कधी आई होऊ शकत नाही, पण आईपेक्षा…” चिमुकलीने सांगितले सासूबाईचे महत्त्व, VIDEO होतोय व्हायरल
Funny video of kid could not recognize his mother after makeup started crying going viral
“बाळा, मीच तुझी मम्मा”, मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक; ढसाढसा रडला अन्..VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Groom's Hilarious funny Ukhana
“…आई आई नाही; बायको बायको करायचं” नवरदेवाने सांगितला भन्नाट उखाणा, VIDEO होतोय व्हायरल

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: म्हणून ट्रक चालकांचा नाद करु नये; ट्रकच्या मागे लिहला खतरनाक मेसेज, वाचून सगळेच लांब जाऊ लागले

सोशल मीडियावर हा व्हिडीओ love_status_24 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आईवरचं प्रेम व्यक्त करत आहेत. एकानं म्हंटलंय, “शेवटी आई आई असते” तर आणखी एकानं “आईसारखा गुरु जगी नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

m

Story img Loader