बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने सध्या तरुणांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.बेरोजगार झालेल्यांमध्ये प्रामुख्याने पदवीधारकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अर्थव्यवस्था म्हणाव्या तितक्या वेगाने आणि सर्वसमावेशक वाढली नाही, हे बेरोजगारीचे सर्वांत मोठे कारण ठरले आहे.कमी शिकलेले तरुण लहान मोठे काम करणे सुरू करतात. मात्र पदवीधर तरुण आपल्या शिक्षणायोग्य नोकरी पाहतात. मात्र नवीन नोकऱ्याच निर्माण होत नसल्याने तरुण बेरोजगार होत आहेत. खूप महिन्यांपासून नोकरी शोधूनही ती मिळत नसल्याने अनेकांनी नाराज होत आता नोकरी शोधणेच थांबविले आहे. अशाच एका बेरोजगार तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायल होत आहे. MBA करुनही या तरुणाला चांगली नोकरी मिळत नसल्याची याची तक्रार आहे. पण जेव्हा त्याला MBA चा फुलफॉर्म विचारला जातो. तेव्हा त्यानं काय उत्तर दिलं हे आता तुम्हीच पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संपूर्ण व्हिडिओमध्ये एक महिला पत्रकार तरुणाशी बोलत आहे. मुलगा पत्रकाराला देशात रोजगार नाही याबाबत तक्रार करत आहे. युवक रोजगाराच्या शोधात भटकत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तो सांगतोय की, आम्हीही एमबीए केले आहे आणि मोटारसायकलवर फिरत आहोत. २० हजार रुपयांच्या नोकऱ्या करत आहोत. आमचे एमबीए करण्यासाठी आमच्या पालकांनी ४-५ लाख रुपये गुंतवले आहेत, ते आम्ही कसे परत करायचे. आमच्या मुलांचे संगोपन कसे करायचे? घर कसे चालवायचे?

यावर, महिला रिपोर्टर तरुणाला विचारते की, तू पाच लाख रुपये गुंतवून एमबीएचे शिक्षण घेतले आहेस, तर कृपया आम्हाला एमबीएचा पूर्ण फॉर्म सांगा. यावर हा व्यक्ती खूप नाराज होतो… हा प्रश्न त्याला विचारला जातो. तेव्हा मात्र त्याचा गोंधळ उडतो. काय बोलावं हेच त्याला कळत नाही. मास्टर बिझनेस अशी काहीशी उत्तर तो देतो. जेव्हा रिपोर्टर पुन्हा पुन्हा विचारते तेव्हा तो तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की तुम्हाला काय माहित नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! चक्क पार्सल घेण्यासाठी मोटरमॅननं थांबवली ट्रेन; रेल्वे रुळावरचा ‘तो’ VIDEO पाहून संतापले लोक

@erbmjha नावाच्या एक्स युजरने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर त्यांनी लिहिले – MBA चा पूर्ण फॉर्म शिका मित्रांनो….हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेजण यावर प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the full form of mba man gives funny reply video viral on social media srk
First published on: 18-03-2024 at 11:48 IST