सोशल मीडियावर सतत नवनवीन ट्रेंड येत असतात, त्यामध्ये कधी गाणी, डान्स तर कधी एखादा कॉमेडी व्हिडीओ व्हायरल होत असतो. जर तुम्ही सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असाल तर सध्याचा ट्रेंड कोणता? हे विचारलं तर तुम्ही लगेच सांगू शकता, इतकं वेड या ट्रे़ंडिग रील्सनी आपणाला लावलं आहे. देशातील नागरिकांचा वाढता सोशल मीडियाचा वापर आणि ट्रेंडच लागलेलं वेड याचा संदर्भ घेत दोन मुलींचा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. तो व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर तो कोणता व्हिडीओ आहे ते जाणून घेऊया.

हेही पाहा- Video: बोल्ड ड्रेस, दारूचा ग्लास अन्… न्यासा देवगणचा सेलिब्रेशन व्हिडीओ पाहिलात का?

Bengaluru firm workers hire goons to beat strict colleague arrested video viral
कामाचा दबाव टाकणाऱ्या व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांनी गुंडांच्या मदतीने केली बेदम मारहाण; पाहा धक्कादायक Video
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  
Instagram down funny memes viral
जगभरात पुन्हा Instagram बंद पडल्याने वापरकर्ते हैराण! मिमर्सने असा घेतला संधीचा फायदा…

एका लग्न समारंभात पाकिस्तानातील मुलीने लता मंगेशकर यांच्या ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ या गाण्यावर भन्नाट डान्स केला होता तो रातोरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्या गाण्याचा ट्रेंड सुरु झाला. या गाण्याच लोकांना इतकं वेड लागलं की त्या गाण्यावर लाखो लोकांनी स्वत:चे व्हिडीओ बनवले तेदेखील व्हायरल झाले होते. शिवाय ‘पतली कमरिया मोरी आय… हाय… हाय…तिरछी नजरिया बोले हाय… हाय…’ या भोजपुरी गाण्याने तर इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून प्रत्येकजण हे गाणं सध्या गुनगुनताना दिसतं आहे.

हेही पाहा- तरुणीला मांडीवर बसवून ‘तो’ बाईक चालवत राहिला; Video व्हायरल होताच पोलिसांनी अशी केली अवस्था

याच गाण्याचा आणि ट्रेंडचा संदर्भ घेत दोन मुलींनी सध्या भारतात काय चालू आहे याचं उत्तर डान्सद्वारे दिलं आहे, त्या डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ Ningmar Yonjan Tmg नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन मुली दिसत आहे. त्यातील एक मुलगी आपल्या हातात एक स्टीलचा ग्लास आहे त्याचा माईक म्हणून वापर करत आपल्या बहिणीला प्रश्न विचारते की, ‘सध्या भारतात कशाचा ट्रेंड सुरु आहे?’ त्यावर दुसरी चिमुरडी ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ हे गाण गात डान्स करताना दिसतं आहे.

शिवाय पुन्हा तिला आणखी काय ट्रेंड सुरु आहे? असा प्रश्न विचारला असता ती खूप मनोरंजक डान्स करत सांगते, ‘पतली कमरिया मोरी हाय हाय, तिरछी नजरिया बोले हाय… हाय.’ हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यापासून आत्तापर्यंत तो ३ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच भावला असून अनेकांनी या दोन मुलींचे तोंडभरुन कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने त्या मुलीला जेंव्हा ट्रेंड काय सुरु आहे? असा प्रश्न विचारला तेंव्हा तिने ‘माझ्या भारतात’ अशी सुरुवात केली ती खूप छान असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एका व्यक्तीने खरंच या दोन्ही मुली खूप सुंदर असल्याचं म्हटलं आहे.