Viral Video : वाढदिवस हा प्रत्येकासाठी खूप खास दिवस असतो. त्या दिवशी प्रत्येक जण आपल्याला जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत असतात. कोणी मेसेज, कॉल करून तर कोणी प्रत्यक्ष भेटून आपल्याला शुभेच्छा देतात. या वाढदिवशी पार्टीचे नियोजन केले जाते, फुगे फुगवले जातात, सुंदर डेकोरेशन केले जाते, मेणबत्ती लावली जाते, केक कापला जातो. मित्र मैत्रीणी, कुटुंबाबरोबर वाढदिवस जल्लोषात साजरा केला जातो.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी तिच्या मित्र मैत्रीणींबरोबर वाढदिवस साजरा करताना दिसते. या व्हिडीओत पुढे तुम्हाला दिसेल की जेव्हा ती कॅन्डल पेटवते, तितक्यात मोठा स्फोट होतो. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा : “असा काय फरक…” अभ्यास न करण्याचं चिमुकलीनं शिक्षिकेला सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून हसू आवरणार नाही
तरुणीने कॅन्डल पेटवताच झाला मोठा स्फोट
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुणी तिच्या मित्र मैत्रीणींबरोबर वाढदिवस साजरा करत आहे. ती मध्ये बसलेली आहे आणि तिच्या आजुबाजूला मित्र मैत्रीणी उभे आहेत. तिच्यासमोर केक ठेवला आहे. जेव्हा ती केकवरील कॅन्डल पेटवते तेव्हा अचानक स्फोट होतो आणि सर्व जण जोरजोराने ओरडतात आणि पळत सुटतात आणि व्हिडीओ येथेच बंद होतो. मिळालेल्या माहितीनुसार, हेलियमने भरलेल्या फुग्यांमुळे हा स्फोट झाला. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
sudhirsingh243 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “पार्टीमध्ये फुग्यांची सजावट गरजेची होती का?”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिलेय, “गॅस बलून होते म्हणून स्फोट झाला.” तर एका युजरने लिहिलेय, “हेलियम गॅस असते फुग्यांमध्ये” आणि एका युजरने लिहिलेय, “यानंतर ही मुलगी तिचा वाढदिवस कधीही साजरा करणार नाही.” एक युजर लिहितो, “ती मुलगी आता बरी आहे का? कोणाला गंभीर दुखापत झाली का?” तर एका युजरने लिहिलेय, “हेलियमने भरलेले फुगे कधीच पार्टीमध्ये वापरू नये.” अनेक युजर्सनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे तर काही युजर्सनी हेलियमने भरलेले फुगे न वापरण्याचा सल्ला दिला आहे.