कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे अनेक कर्मचारी त्यांच्या कंपनीसाठी आणि बॉससाठी काम करण्यास नेहमीच तयार असतात. बॉसच्या नजेरत आपली चांगली इमेज तयार करण्यासाठी काही कर्मचारी तर सुट्टीच्या दिवशी आणि ऑफिसची वेळ संपल्यानंतरही जादा काम करत बसतात. पण काही कर्मचारी असे असतात ज्यांना सुट्टीच्या दिवशी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा असतो किंवा आपली इतर महत्त्वाची कामं उरकायची असतात. या दिवशी ऑफिसमधून बॉसचा किंवा कोणाचाही फोन येऊ नये असे त्याला वाटत असते. असे असताना जर अचानक बॉसचा कॉल आलाच तर नाईलाजाने सुट्ट्याची दिवशीही काम करावे लागते. पण सध्या सोशल मीडियावर अशा एका कर्मचारी आणि बॉसची व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अगदी धाडसी कर्मचारी, ज्याला बॉसने सुट्टीच्या दिवशी एक तास काम करा सांगितले पण त्याने सरळ नकार दिला आहे.
बॉसच्या व्हॉट्सअप मेसेजला कर्मचाऱ्याने दिला असा रिप्लाय
अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या बॉसने सांगितलेल्या कामास नकार देणे अवघड जाते. त्यामुळे मनात नसतानाही ते बॉसने सांगितलेले काम करत राहतात. पण एका ट्विटर युजरने सर्वांसमोर एक सकारात्मक उदाहरण ठेवले आहे. रघू नावाच्या एका युजरने आपल्या व्हॉट्सअप चॅटचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यात त्याने पाच वर्षे संघर्ष केल्यानंतर बॉसला सुट्टीच्या दिवशी काम करण्यास कसा नकार दिला हे सांगितले आहे.
रघूने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये दिसतेय की, सुट्टीच्या दिवशी बॉसने त्याला काम करण्यास सांगितले कारण त्या दिवशी क्लायंटला काही काम करुन द्यायचे होते. यात बॉसने 2-4 टॅग लाइन्ससह मदत करण्यासाठी एक तासाच्या काम करण्याची विनंती केली, ज्यावर त्याने उत्तर दिले की, “मी उद्या फर्स्ट हाफपर्यंत यावर काम करू शकतो. पण आज नाही.
बॉससोबतच्या चॅटचा स्क्रीनशॉट ट्विटरवर केला पोस्ट
त्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, ऑफिसव्यतिरिक्त जादा कामासाठी हो म्हणणे आपल्यासाठी धोकादायक ठरु शकते आणि यातून तुम्ही तुमचे आयुष्य आणखी संकटात टाकत आहात. कामाच्या नावाखाली पिळवणूक सुरु आहे हे एका कर्मचाऱ्याला स्वतःला माहीत असते, पण तरीही तो काम करण्यास तयार असतो.
रघूने स्क्रीनशॉटसह ट्विटमध्ये लिहिले की, सुट्टीच्या दिवशी काम करणार नाही असे सांगण्यास मला ५ वर्षे लागली. पण तुमचेही माझ्यासारखे होऊ नये असे वाटत असल्यास वेळीच ठोस निर्णय घ्या. हॅप्पी उगादी.
यावर काहींनी त्याला विचारले की, बॉसचा मेसेज वाचल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष का केले नाही आणि त्यावर तू काम न करण्यास काही कारण का दिले नाही? यावर रघूने उत्तर दिले की, मला ते कसे करायचे ते माहित आहे. पण मला हे टाळण्याऐवजी माझा निर्णय सरळ सांगून टाकायचा होता.
अनेक युजर्सनी रघूच्या धाडसाचे कौतुक केले आहे. तूच खरा हिरो असल्याचे म्हणत अनेकांनी त्याचे कौतुक केलं आहे. तर काहींनी त्यावर भन्नाट भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. पण रघूचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो की अयोग्य? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.