फेसबुकसह व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम ही लोकप्रिय समाजमाध्यमे सोमवारी रात्री ठप्प झाल्याने त्यांचे भारतासह जगभरातील कोट्यवधी वापरकर्ते अस्वस्थ झाले होते. तांत्रिक बिघाडामुळे फेसबुकसह इन्स्टाग्राम आणि व्हॉटअॅप या समाजमाध्यमांची जगभरातील सेवा खंडित झाली. तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या सेवेत व्यत्यय आल्याचे सांगण्यात येत असले तरी कंपनीने नेमके कारण मात्र उघड केलेले नाही. इंटरनेटवर ग्लोबल आऊटरेज म्हणजेच जागतिक स्तरावर खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेच्या तब्बल सहा तासांनंतर तिन्ही सेवा हळूहळू पुन्हा रुळावर येत आहेत. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.
जगभरात सोमवारी रात्री अचानक जगभर व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद पडले. मात्र या काळात ट्विटरच्या सेवा कार्यरत होत्या. यानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलने व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद झाल्यानंतर ट्विटरवर एक मजेदार ट्विट केले, जे खूप व्हायरल होत आहे. आयपीएल २०२१च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या पंजाब किंग्जच्या केएल राहुलने लोकांना ट्विटर विचारले की ते आपल्या फावल्या वेळेत काय करत आहात.
राहुलने ट्विटरवर, “मग प्रत्येकजण आपल्या मोकळ्या वेळात काय करत आहे?”, असे विचारले. राहुलचे हे ट्विट व्हायरल झाले आणि चाहत्यांनी त्यावर काही मजेदार कमेंट्सही केल्या.
कालच्या तिसऱ्या अंपायरबद्दल विचार करत आहे
फक्त चेन्नई विरुद्ध विजय मिळवा आणि आपल्या कर्णधार विराटवर कृपा करा.
अथिया शेट्टीशी गप्पा मारता येत नाहीत?
Whatsapp Fb आणि Insta चे सर्व्हर दुरुस्त करत आहे
दरम्यान, आयपीएल २०२१मध्ये राहुलने कर्णधारपदी विशेष कामगिरी केली नसली तरी फलंदाज म्हणून हा हंगाम त्याच्यासाठी खूप चांगला गेला आहे. राहुलने १२ सामन्यांमध्ये ५२.८० च्या सरासरीने एकूण ५२८ धावा केल्या आहेत. या दरम्यान राहुलने १२९.०९ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आणि पाच अर्धशतके केली. राहुलकडे सध्या या स्पर्धेत ऑरेंज कॅप आहे.
