तुमचा मित्र संकटात आहे, त्याला मदत करा; WhatsApp वर असा मेसेज आला असेल तर सावधान; सुरु आहे मोठा घोटाळा

व्हॉट्सअॅपवर मित्राला गरज “friend in need” असा एका घोटाळा सुरु आहे

WhatsApp, Whats App, Friend in Need,
व्हॉट्सअॅपवर मित्राला गरज “friend in need” असा एका घोटाळा सुरु आहे

जगभरात व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मीडिया अ‍ॅप आहे. यामुळेच याचा आधार घेत अनेकदा लोकांची फसवणूक केली जाते. व्हॉट्सअ‍ॅपवरुन फॉरवर्ड होणारे मेसेज, चॅट यांची अनेकदा खातरजमा केली जात नाही, यामुळे अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. दरम्यान सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर मित्राला गरज “friend in need” असा एका घोटाळा सुरु आहे. अनेक युजर्सना त्यांच्या मित्राकडून मदत हवी असल्याने मेसेज येत आहेत. यामधील सर्वाधिक युजर्स युकेमधील आहेत.

या नव्या घोटाळ्यात घोटाळेबाज युजर्सना मित्र असल्याचं भासवत फसवणूक करत आहेत. युजर्सना त्यांच्या मित्रांकडून मेसेज येत असून यामध्ये आपण विदेशात अडकलो असून घरी परतण्यासाठी पैशांची गरज असल्याचं सांगितलं जात आहे. एक ५३ वर्षीय महिला या घोटाळ्याला बळी पडली असून मुलाच्या नावे आलेल्या मेसेजनंतर तिने अडीच लाख रुपये पाठवले.

युकेमधील नॅशनल ट्रेडिंग स्टॅण्डर्डनुसार, जवळपास ५९ टक्के नागरिकांना असे मेसेज आले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपने याची दखल घेतली असून युजर्सना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

नॅशनल ट्रेडिंग स्टॅण्डर्ड्स स्कॅम टीमचे प्रमुख बॅक्स्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “घोटाळेबाज आपल्या मित्र किंवा कुटुंबीयांकडून मेसेज आल्याचं भासवत खासगी माहिती, पैसे किंवा सहा अंकी पिन मागतात”. युर्जसने काळजी घ्यावी असा सल्ला देताना व्हॉट्सअ‍ॅपने सांगितलं आहे की, “जर तुम्हा संशयास्पद मेसेज आला तर फोन करणं किंवा व्हॉईट मेसेज मागवून त्याची सत्यता पडताळणं सर्वात सोपा मार्ग आहे”.

हा घोटाळा कसा केला जातो ?

आपल्या मित्राच्या किंवा कुटुंबीयांच्या फोन क्रमांकावरुन व्हॉट्सअ‍ॅप मेसेज कसा काय पाठवला जाऊ शकतो असा विचार तुमच्या मनात नक्की आला असेल. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, घोटाळेबाजांकडून तडजोड झालेली खाती किंवा क्रमांकाचा वापर केला जातो. असे मेसेज हॅक केलेल्या फोन क्रमांक किंवा खात्यावरुन पाठवले जातात. जर तुमच्या मित्राचा फोन हरवला असेल तर त्याच्या फोनवरुन चोर किंवा घोटाळेबाजांकडून असे मेसेज पाठवले जाण्याची शक्यता असते.

अशा घोटाळ्यांपासून वाचण्याचा मार्ग काय ?

जर तुम्हाला पैसे मागणारा मेसेज आला तर त्याला लगेच उत्तर देण्याऐवजी फोन करा. अशा कोणत्याही मेसेजवर तात्काळ प्रतिक्रिया देण्याआधी नेहमी पडताळणी करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Whatsapp friend in need scam is doing the rounds sgy

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक
ताज्या बातम्या