Guinness World Record : गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे इंस्टाग्राम अकाउंट विविध व्हिडिओंनी भरलेले आहे ज्यांनी वेगवेगळे रेकॉर्ड नोंदवले आहेत. अशाच एका विक्रमाबद्दल त्यांनी शेअर केलेल्या एक व्हिडिओने सर्वांना आश्चर्यचकित केले आणि प्रेरणा देखील दिली आहे. हा व्हिडिओमध्ये व्हीलचेअरवर बसलेली एक व्यक्ती दुबईमधील रस्त्यांवरुन फिरताना दिसत आहेत. या व्यक्तीने जगातील सर्वात मोठे GPS ड्रॉईंग तयार केले आहे.

व्हीलचेअरवर बसून साकारले सर्वात मोठे जीपीएस ड्रॉईंग

बुर्ज खलिफा परिसर आणि दुबई मॉलमधून प्रवास करत जीपीएसद्वारे त्याने व्हीलचेअरबद्ध लोगोचा आकार साकारला आहे. 8.71 किमी (5.41 मैल) अंतराचे सर्वात मोठे जीपीएस ड्रॉईंग (वैयक्तिक) (CID2) साकारणारा सुजीथ वर्गीस’ असे कॅप्शन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने (GWR) इंस्टाग्राम पोस्टला दिले आहे. “2013 मध्ये एका बाईक अपघातामुळे सुजितला अर्धांगवायू झाला. दृढनिश्चयी असलेल्या सर्व खेळाडूंना प्रेरणा आणि बळ देण्यासाठी त्याने हा विक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे” असेही त्यांनी कमेंटमध्ये सांगितले आहे.

Drunken man's head stuck in garden
दारुच्या नशेत बागेत झोपला होता व्यक्ती, अचानक बाकामध्ये अडकलं डोक….पुढे जे घडले ते व्हिडीओमध्ये बघा
Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर
Essel Propack Limited Attractive durable quality in packaging
वेष्टनांतील आकर्षक, टिकाऊ गुणवत्ता
an Old uncle and a young boy inside Delhi metro over seat issues
“रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये…” तरुण अन् वृद्ध व्यक्तीमध्ये पेटला वाद, दिल्ली मेट्रोतील VIDEO होतोय व्हायरल

जगाला दिला प्रेरणादायी संदेश

संस्थेने मध्य पूर्व भागात केल्या जाणाऱ्या विक्रमांना समर्पित त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या अविश्वसनीय कामगिरीबद्दल हीच पोस्ट अरबी भाषेत लिहिलेली आहे जी भाषांतर केल्यानंतर समजते. या कॅप्शनमध्ये रेकॉर्ड करणाऱ्या सुजित वर्गीस GWRसोबत बोलताना दिलेली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “प्रत्येकाला समजेल असा आणि भाषांच्या सीमा ओलांडणारा असा लोगो साकारण्याचा अनुभव खूप सुंदर होता. आम्ही जगभरातील समविचारी लोकांच्या समुदायांना दुबई आणि गिनीज ऑफ वर्ल्ड रेकॉर्डद्वारे जगाला संदेश पाठवला आहे. दुबईमध्ये हे सर्व अनुभवणे खूप सुंदर होते, हे शहर मूल्यांनी आणि महत्त्वाच्या लोकांच्या प्रवेशयोग्यतेने सर्वात समृद्ध आहे.”



शेतकऱ्याचा नादचं खुळा! शेतातील प्राणी, पक्ष्यांना हाकलण्यासाठी तयार केला ‘हा’ देसी जुगाड, Viral Video एकदा पाहाच

सोशल मिडियावर व्हिडिओला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद

या व्हिडिओ १९ मार्च रोजी पोस्ट केला असून आतापर्यंत ४.६ लाखांपेक्षा जास्त लोकांना पाहिला आहे आणि या आकडेवारीमध्ये आणखी वाढ होत आहे. या व्हिडिओला जवळपास ४५००० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. लोकांनी अनेक कमेंट्स करत व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

“अभिनंदन सुजित!!! हे अद्वितीय आहे!!!” अशी कमेंट एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने व्हिडिओवर लिहिली आहे.“तुमची मर्यादा तुम्हीच ठरवा,” असेही दुसऱ्याने म्हटले आहे. “ते त्याच्यासाठी खूप छान आहे,” असे तिसऱ्याने सांगितले आहे तर, चौथ्या व्यक्तीने ‘तु यासाठी पात्र आहेस’ अशी कमेंट केली आहे.

बसमध्ये महिलांना ५० टक्के सवलत; कंडक्टरची तिकीट काढण्यासाठी कसरत, Video पाहून पोट धरुन हसाल

जीपीएस ड्रॉईंग म्हणजे काय?

जीपीएस ड्रॉईंग, ज्याला जीपीएस आर्ट म्हणूनही ओळखले जाते, ही एक चित्र काढण्याची पद्धत आहे जिथे कलाकार ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम डिव्हाइस (GPS Device) वापरतो आधीच ठरलेल्या रस्त्यावरुन प्रवास करतो आणि मोठ्या क्षेत्रावर चित्र किंवा नमुना तयार करतो. असे चित्र काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान रेकॉर्ड केलेली GPX डेटा फाइल नंतर दृश्यमान केली जाते, सामान्यतः मॅपवर एका ओळीच्या रूपात मांडली जाते.