Robot Malfunction Video : ९ ते ५ चा रोजचा एकसुरी जॉब… टार्गेट्स, प्रेशर आणि थकवा—हे सगळं आता रोबोटलाही सहन होत नाहीये? हे आमचे मत नाही, नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने हा प्रश्नच उपस्थित केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये काम करता करून करून एक रोबोट अचानक हँग होतो अन् अचानक भांडी फोडतो अन् डान्स करू लागतो. जर क्षमतेपेक्षा जास्त काम करून मशीनची जर अशी अवस्था होत असेल, कधी८-९ तास,कधी १२-१२ तास, तर कधी २४-२४ तास काम करणाऱ्या माणसांचे काय होत असेल? असा प्रश्न सर्वांना पडत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये रेस्टॉरंटमधील एक रोबोटचे अचानक नियंत्रणाबाहेर जातो अन् भाड्यांची तोडफोड करताना दिसत आहे. आपल्या धातूच्या हातांनी जोरात हातवारे करताना दिसतो, तर आजूबाजूचे ग्राहक हा प्रकार पाहून घाबरलेले दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक कर्मचारी त्या बिघडलेल्या रोबोटला थांबवण्याचा प्रयत्न करतानाही दिसते.

काही सोशल मीडिया युजर्सच्या मते ही घटना चीनमध्ये घडली आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कधी आणि कुठे शूट करण्यात आला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, तसेच या घटनेची स्वतंत्र पुष्टीही झालेली नाही.

व्हायरल क्लिपमध्ये “I’m Good” असा मजकूर असलेला केशरी ऍप्रन रोबोट घातलेला दिसतो. तो काउंटरवरील प्लेट्स जोरात फेकताना दिसतो. एक महिला कर्मचारी त्या रोबोटला पकडून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. दरम्यान, जवळ बसलेले ग्राहक हा सगळा गोंधळ पाहत असल्याचे दिसते आणि पार्श्वभूमीत मोठ्याने हसण्याचे आवाजही ऐकू येतात. हा विचित्र प्रकार सोशल मीडियावर झपाट्याने पसरला असून, लोकांकडून मजेशीर तसेच थोड्या चिंतेच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

एका X (ट्विटर) युजरने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हटलं, “हा व्हिडिओ भन्नाट आहे—जणू AI नेच ठरवलंय की ९ ते ५ जॉब आपल्यासाठी नाही! हा एका हॉटपॉट रेस्टॉरंटमधील सर्व्हिस रोबोट आहे. साधारणपणे असे छोटे रोबोट्स अन्न देणे, टेबल साफ करणे आणि शांतपणे फिरणे यासाठी वापरले जातात. पण हा रोबोटच्या यंत्रणेत मध्येच बिघडला आणि जणू डिस्कोमध्ये असल्यासारखा नाचायला लागला, शिवाय भांडीही फोडली. स्टाफला त्याला थांबवण्यासाठी अक्षरशः धावपळ करावी लागली, आणि तो एक मिनिटभर ‘डान्स’ करतच राहिला. पूर्ण गोंधळच होता.”

दुसऱ्या युजरने लिहिलं, “म्हणूनच emergency stop बटण सहज उपलब्ध असायला हवं.” तर तिसऱ्याने विनोद करत म्हटलं, “कल्पना करा, HR डॉक्युमेंटमध्ये ‘रोबोटला काहीही पश्चात्ताप नाही’ असं लिहावं लागलं तर? माणूस-टेक्नॉलॉजी नात्याचा हा कळसच ठरेल!”

काही प्रतिक्रिया मात्र थोड्या चिंताजनकही होत्या. एका युजरने लिहिलं, “एका साध्या रेस्टॉरंट रोबोटला कंट्रोल करण्यासाठी ३ जण लागले. उद्या जर अशा रोबोट्सना शस्त्रं आणि प्रगत AI मिळालं आणि ते नियंत्रणाबाहेर गेले तर? त्यांनी सरकार पाडलं, अण्वस्त्रांवर ताबा मिळवला तर? मग ‘अँड्रॉइड्सने भविष्य उद्ध्वस्त केलं’ अशी परिस्थिती निर्माण होईल.”