When the grandmother was packing her bag to leave the house, the dog got upset and tried to stop her | Loksatta

‘आजी जाऊ नको ना…’; बाहेर जाणाऱ्या मालकिणीला थांबण्याची विनंती करणाऱ्या कुत्र्याचा भावनिक Video पाहिलात का?

एक महिला घरातून बाहेर जाण्याती तयारी करत असताना कुत्रा त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो

‘आजी जाऊ नको ना…’; बाहेर जाणाऱ्या मालकिणीला थांबण्याची विनंती करणाऱ्या कुत्र्याचा भावनिक Video पाहिलात का?
मुक्या प्राण्यांना आपण जेवढा जीव लावतो त्याच्या कित्येक पटीने ते आपल्याला जीव लावतात. (Photo : Instagram)

मुक्या प्राण्यांना आपण जेवढा जीव लावतो त्याच्या कित्येक पटीने ते आपल्यावर जीव लावतात. अशी आपण अनेक उदाहरणं पाहत असतो. याबाबतचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यामध्ये एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीला चोरट्यांनी लुबाडण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा कुत्रा त्यांच्या मदतीला धावून जातो आणि चोरांना चावतो, अशा अनेक घटना सांगता येतील. शिवाय कुत्रा हा मुक्या प्राण्यांमध्ये सर्वात जास्त घरांमध्ये पाळला जाणारा प्राणी असून तो प्रामाणिक सुद्धा असतो. त्यामुळे अनेकांना घरामध्ये कुत्रा पाळायला आवडतं.

सध्या अशाच एका आजींचा आणि कुत्र्याच्या प्रेमळ नात्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये हा कुत्रा आपल्या मालकीण आजीबाईला घरातून जाऊ नको सांगण्याचा केविलवाना प्रयत्न करताना दिसतं आहे. कुत्रा असो अन्य कोणताही मुका प्राणी प्राणी त्यांना माणसे काय बोलतात किंवा करतात ते समजत नाही. मात्र, हे सर्वच गोष्टींमध्ये लागू होत नाही. कारण, आपले शब्द त्यांना समजत नसले तरी ते भावना समजू शकतात. याबाबतची अनेक उदाहरणे देता येतील जेव्हा कुत्र्यांना त्यांच्या मालकाच्या भावना आणि हावभाव समजतात.

हेही पाहा- महिलांचा करेक्ट कार्यक्रम! भलेमोठे गवताचे बंडल रोबोप्रमाणे क्षणात लोकलमध्ये चढवले; Video पाहून व्हाल थक्क

कुत्र्याला आपल्या मालकाच्या कृतीवरुन तो काय करणार आहे हे समजतं. याचीच साक्ष देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून @thepawsomelifeofmurphy नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन तो शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये एक महिला घरातून बाहेर जाण्याती तयारी करत असताना कुत्रा त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाय तो आपल्या ‘आजी जाऊ नको ना…’; बाहेर जाणाऱ्या मालकिणीला थांबण्याची विनंती करणाऱ्या कुत्र्याचा भावनिक Video पाहिलात का?जाऊ नको असं सांगत आहे. हे दृश्य खूपच मनमोहक असून अनेकांनी मुक्या प्राण्याचं प्रेम हेच खरं असल्याचं म्हटलं आहे.

व्हिडिओमध्ये एक महिला घरातून कुठेतरी बाहेरगावी जाण्यासाठी बॅग भरताना दिसतं आहे. जेव्हा कुत्र्याला आपली मालकीन कुठे तरी बाहेर जाणार असल्याचं कळतं त्यावेळी तो आपल्या मालकीणीकडे येतो आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तो महिलेच्या अंगावर उड्या घेतो आणि त्यांचा हात पकडण्याचा प्रयत्न करत त्यांना जाऊ नको असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर मालकिणदेखील आपण लगेच माघारी येणार असल्याचं त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ शेअर केल्यापासून जवळपास ६ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. शिवाय अनेकांनी या व्हिडीओखाली अनेक सुंदर कमेंट केल्या आहेत. एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिलं आहे की, आपण बाहेर कुठे जाणार आहोत हे कुत्र्यांना नेमकं माहित असतं.’ तर हा कुत्रा खूप सुंदर असल्याचंही एका नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर कुत्रा हा खूप सुंदर आणि मालकाला लळा लावणारा प्राणी असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 18:13 IST
Next Story
‘मेरा दिल ये पुकारे आजा’ फेम पाकिस्तानी तरुणीला विकायचाय तिचा हिरवा ड्रेस; किंमत आहे तब्बल….