scorecardresearch

ट्रॅफिक पोलिसाने रस्त्यावरील सर्व गाड्या थांबवल्या आणि मांजरीला रस्ता मोकळा करून दिला…; पाहा VIRAL VIDEO

आम्हाला खात्री आहे की हे वाचून तुम्हाला खूप विचित्र वाटलं असेल. कोणताही ट्रॅफिक पोलिस हे करू शकतो का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. पण आजच्या काळात काहीही अशक्य नाही. पाहा हा व्हायरल व्हिडीओ…

Cat-Road-Crossing-VIRAL-VIDEO
Photo: Twitter/ ramblingsloa)

Viral Video of Traffic Signal: आम्हाला खात्री आहे की हे वाचून तुम्हाला खूप विचित्र वाटलं असेल. कोणताही ट्रॅफिक पोलिस हे करू शकतो का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. पण आजच्या काळात काहीही अशक्य नाही. सर्वकाही शक्य आहे. असे काही लोक असतात ज्यांना अशक्य गोष्टी कशा शक्य करायच्या हे चांगलं माहीत असतं. सोशल मीडियावर तुम्ही प्राण्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, पण आता जे समोर आले आहे ते खूपच गोंडस आहे. लोकांकडून या व्हिडीओला खूप पसंती मिळत आहे, तसंच पोलिस कर्मचाऱ्याचं खूप कौतुक होत आहे.

तुम्हा सर्वांना माहित असेलच की अशी घटना रोजच घडत असते. यात कितीतरी प्राणी दररोज आपली जीव गमावतात. कधी रस्त्यावरील अपघातात तर कधी रेल्वे ट्रॅकवर अनेक प्राण्यांचा मृत्यू होतो. माणसाला जेवढ्या वेदना होतात, तेवढ्याच वेदना एखाद्या प्राण्यालाही होतात. मग प्राणी आणि माणूस असा भेदभाव कसा? नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांनी तो लाईक केला आहे. या व्हिडीओमध्ये एक ट्रॅफिक पोलीस रस्त्यावरील सर्वच्या सर्व गाड्या थांबवून ठेवतो आणि एका मांजरीला रस्ता ओलांडण्यासाठी रस्ता मोकळा करून देतो. हे पाहून सोशल मीडियावरील नेटकरी या ट्रॅफिक पोलिसाच्या प्रेमात पडले आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चोरटा सायकल चोरण्यासाठी घरात घुसला…पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही !

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ओळखा पाहू या टोपीचा रंग कोणता ? हिरवा की तपकिरी? रंग बदलणाऱ्या टोपीचा VIDEO VIRAL; तुम्हाला काय दिसतंय ?

हा व्हिडीओ इंडोनेशियाचा असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘Ramblings’ नावाच्या पेजवर तुम्ही सर्वजण हा व्हिडीओ पाहू शकता. जेनिफर रॉकवुडच्या काही ओळी शेअर करताना पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘तुम्ही इतरांच्या आयुष्यात कोणता प्रकाश टाकू शकता हे तुम्हाला कधीच माहीत नाही, फक्त तुमचा दयाळूपणा आणि हे एक सुंदर उदाहरण आहे.’ व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत २१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. ‘हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती…सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी’ या एका कवितेतील ओळींमधला माणुसकीचा अर्थ या व्हिडीओमधून दिसून आला. नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली कमेंट्स सेक्शनमध्ये प्रतिक्रिया व्यक्त करत ट्रॅफिक पोलिसावर कौतुकाचा वर्षाव केलाय. “हा व्हिडीओ खरंच खूप सुंदर आहे, हल्ली हे चित्र फार कमी दिसून येतं.” अशी प्रतिक्रिया एका युजरने दिलीय. काही युजरने मांजरीचंही कौतुक केलंय. ” मांजरही खूप हूशार आहे, पोलिसांच्या सुचनांचं कसं पालन करावं हे या मांजरीलाही कळतं” असं लिहित आणखी एका युजरने मांजरीच्या हुशारीचं कौतूक केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-11-2021 at 17:38 IST
ताज्या बातम्या