युनायटेड स्टेट्सचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन १ नोव्हेंबर रोजी COP26 जागतिक परिषदेत उपस्थित असताना झोपताना दिसले. Disclose.tv ने हवामान बदल जागतिक परिषदेत बायडेन झोपलेले असल्याचा व्हिडीओ शेअर केला. एक्स्प्रेस यूकेच्या म्हणण्यानुसार, बार्बाडोसचे पंतप्रधान मिया मोटली त्यांच्या देशाने हवामान बदलाचा सामना करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारांवर भाषण देत असताना थकलेले आणि विचलित बायडेन झोपलेले दिसले.

नक्की काय झालं?

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना इतरांच्या भाषणादरम्यानही डोळे मिटून खूप वेळापर्यंत बसले होते, अनेकदा ते जमिनीकडे पाहत होते, विचलितही वाटत होते. युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आयोजित केलेल्या ग्लासगो येथे COP26 जागतिक परिषदेतच्या पहिल्या दिवशी हे घडले.जॉन्सन यांनी नुकतेच एक भाषण केले होते ज्यात जागतिक नेत्यांना कार्य करण्याची निकड सांगण्याचा प्रयत्न केला होता. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी नेत्यांसमोरच्या कार्याची तुलना काल्पनिक नायक जेम्स बाँडच्या डूम्सडे यंत्राला डिफ्युज करण्याशी केली होती.

( हे ही वाचा: पाककडून हारल्यानंतर तुम्ही TV फोडला का? विचारणाऱ्याला आकाश चोप्राचं भन्नाट उत्तर, “मित्रा, आमच्याकडे…” )

युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या भाषणांनंतर, जेव्हा बार्बाडोसचे पंतप्रधान मिया मोटली हे संमेलन “इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या बैठकांपैकी एक संमेलन ” यावर चालणारे भाषण देत होते. तेव्हा जो बायडेन यांचे डोळे काहीसे मिटले आहेत असे दिसते.

हवामान-बदल परिषदेत, सर्व नेत्यांनी २१०० पर्यंत ग्लोबल वॉर्मिंग १.५ डिग्री सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्याचे मान्य केले आहे जे सध्या २.७ डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे. संयुक्त राष्ट्रांनी इशारा दिला आहे की जर ग्लोबल वार्मिंग सध्याच्या दराने सुरू राहिली तर ते “हवामान आपत्ती” ला कारणीभूत ठरेल.