मुंबई लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी समजली जाते. मुंबईकरांना प्रवास करण्यासाठी मुंबई लोकल हेच सर्वोत्तम साधन असल्याचं अनेकदा सिद्ध झालं आहे. मुंबईत कराव्या लागणाऱ्या प्रवासाच्या अंतराचा विचार करता, इतर कुठल्याही साधनाने प्रवास करणे परवडत नाही. वेळ आणि त्यासाठी येणारा खर्च या दोन्ही दृष्टीने मुंबई लोकल सामान्यांना परवडणार वेगवान माध्यम आहे. त्यामुळेच दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या कामाच्या स्थळी वेळेत पोहोचणे आणि काम संपवून घरी पोहोचण्याची लगबग, या प्रक्रियेत अनेकदा मुंबईकरांच्या रागाचा पारा चढताना दिसतो. मुंबई लोकलच्या महिला डब्यातील असाच एक प्रसंग सध्या इंटरनेटवर व्हायरल (Viral on internet) होत आहे. गर्दीच्या वेळेचा बोरिवली स्थानकावरील २२ नोव्हेंबर सकाळी ८:३० च्या सुमारास घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

(आणखी वाचा : झकास! बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा त्याच्या ‘या’ लक्झरी कारसोबतचा फोटो झाला व्हायरल )

महिलेला मिळाली VIP ट्रीटमेंट

या व्हिडिओत एका महिला एसी ट्रेनमधील प्रवाशाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या डिबोर्डिंग विनंतीला नकार दिल्याचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाला. एक महिला एसी लोकलमध्ये चढली. पण गर्दीमुळे तिला फूटबोर्डवर लटकून उभे राहावे लागले. आता दरवाजे लागेल नाहीत तर ट्रेन पुढे जाणार नाही, मग काय, महिलेने ट्रेनमधून उतरण्यास नकार दिला.

रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे कर्मचारी आले तरी ती महिला कोणाला ऐकत नव्हती. अखेर ट्रेन गार्डने तिला समजवण्यासाठी पुढाकार घेतला. अखेर या महिला प्रवासीला VIP ट्रीटमेंट देण्यात आदिली. या महिलेला मोटरमनने केबिनमध्ये बसून प्रवास करण्याची विनंती केली. त्यानंतर महिला प्रवाशी खाली उतरली आणि थेट मोटारमन केबिनमध्ये गेल्या व तिथे बसून प्रवास केला. अखेर लोकल ट्रेन सुटली.

@Virendra Chauhan नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अधिक लोकांनी पाहिला असून आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When the woman did not get a place in a crowded local the train was stopped then the driver gave vip treatment pdb
First published on: 03-12-2022 at 14:22 IST