Viral Video : पोलीस हा समाजात सुव्यवस्था व कायदा राखण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. हे २४ तास जनतेच्या सेवेसाठी हजर असतात. काही वेळा त्यांना कामामुळे कुटुंबाला फार वेळ देता येत नाही. सध्या असाच पोलिसांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दोन सख्खे भाऊ जेव्हा पोलीस असतात, तेव्हा काय घडते? हे तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसून येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (When two brothers are cops, watch emotional video showcasing love of the police sibling)

हा व्हायरल व्हिडीओ एका पोलीसांच्या घरातील आहे. जेव्हा घरातील दोन सख्खे भाऊ पोलीस असतात, तेव्हा काय घडते? हे तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसून येईल. या व्हिडीओत तुम्हाला एक पोलीस असलेले भाऊ घरात प्रवेश करताना दिसतात. घरात प्रवेश करताना ते पायातले शूज काढतात त्यानंतर डोक्यावर टोपी घालतात. त्यांच्या मोठ्या भावासमोर जातात आणि त्यांना पोलीसाच्या अंदाजात सलाम करतात. त्यांचे मोठे भाऊ जे पोलीस आहेत, ते सुद्धा त्यांना सावधान स्थितीत त्यांची सलामी स्वीकारतात. त्यानंतर पोलीस त्यांच्या मोठ्या भावाच्या पाया पडतात आणि त्यांना मिठी मारतात. मोठे भाऊ त्यावेळी भावुक होताना दिसून येतात. या दोन्ही पोलीस भावंडाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

mazhi tuzhi reshimgaath fame myra vaikul little Brother ears were pierced video viral
Video: मायरा वायकुळच्या चिमुकल्या भावावर झाले कर्णवेध संस्कार, पाहा व्हिडीओ
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
The young man suddenly got dizzy in the metro only mother came to help
मेट्रोमध्ये तरुण अचानक चक्कर येऊन पडला, शेवटी आईच धावून आली, पाहा Viral Video
Delhi crime News
Delhi : धक्कादायक! टोपीवरून झालेल्या वादातून तरुणाची गोळ्या झाडून हत्या; आरोपीच्या आईने पुरवली बंदूक
Emotional Wedding Video
वेड्या बहिणीची वेडी ही माया! बहि‍णीला हळद लावताना ढसा ढसा रडला भाऊ, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Man Assaults Woman In Greater Noida
VIDEO : केस पकडले, कानशीलात लगावल्या; तरुणाची भररस्त्यात मैत्रिणीला मारहाण
Man Ask Auto Riksha Driver Dog drop him to Panve
VIRAL VIDEO : दादा, पनवेलला सोडाल का? श्वान बनला रिक्षाचालक; तरुणाने गंमत करताच पाहा कसे दिले एक्स्प्रेशन
In Kendur village cousin was nearly crushed under car over land dispute
Video : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना

हेही वाचा : राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा यांना पदावरून काढलं? Viral Post मुळे खळबळ, पण सत्य काय? वाचा

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : लय अवघड हाय गड्या उमगाया बाप रं! लेकाच्या स्वागतासाठी वडील स्वत: उतरले मैदानात; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

shrikant_bunty या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वाघमारे कुटुंब” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “डोळ्यातील अश्रू सांगतायेत जिव्हाळा किती आहे तो!!” तर एका युजरने लिहिलेय, “वर्दी म्हणजे एकदम रुबाबदार वाटतं, माझे पप्पा पण पोलिस होते आता रिटायर झाले. पण या वर्दी काय धमक आणि चमक असते ती कोणी विसरू नाही शकत.” आणखी एका युजरने लिहिलेय, “इन्स्टाग्राम वरील सगळ्यात छान भारी जबरदस्त मनाला भावणारा व्हिडिओ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी या वाघमारे पोलीस भावंडावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.